जेसलपार्क चौपाटीवर सीसीटीव्ही कॅमेरे लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:15 IST2021-02-21T05:15:17+5:302021-02-21T05:15:17+5:30

मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क चौपाटी भागात भुरटे चोर व गर्दुल्ल्यांसह अश्लील चाळे करणाऱ्या युगुलांचा जाच वाढला ...

Install CCTV cameras at Jesalpark Chowpatty | जेसलपार्क चौपाटीवर सीसीटीव्ही कॅमेरे लावा

जेसलपार्क चौपाटीवर सीसीटीव्ही कॅमेरे लावा

मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क चौपाटी भागात भुरटे चोर व गर्दुल्ल्यांसह अश्लील चाळे करणाऱ्या युगुलांचा जाच वाढला असल्याने, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी ज्येष्ठ भाजपा नेते तथा नगरसेवक रोहिदास पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ.विजय राठोड यांच्याकडे केली आहे.

अश्लील चाळे करणाऱ्या युगुलांमुळे नागरिक त्रासले असून, विशेषतः महिलांना याचा मनःस्ताप होत आहे. भुरटे चोर-व्यसनींचा जाच वाढला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्कालीन नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत पाटील यांनी महापालिकेस पत्र देऊन रेल्वे समांतर मार्ग, चौपाटी व कोळीनगर येथे सीसीटीव्ही बसवण्याची विनंती केली होती, परंतु अजून ते बसविले नसल्याचे पाटील यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

आश्चर्याची बाब म्हणजे चौपाटीवर सहायक पोलीस आयुक्त व नवघर पोलीस चौकी असतानाही येथे गैरप्रकार वाढल्याच्या तक्रारींबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Install CCTV cameras at Jesalpark Chowpatty