उल्हासनगर महापालिका आयुक्ताकडून रस्त्यातील खड्ड्यांची पाहणी
By सदानंद नाईक | Updated: July 18, 2023 18:45 IST2023-07-18T18:45:10+5:302023-07-18T18:45:21+5:30
उल्हासनगर महापालिका, एमआयडीसी व शासनाच्या विविध निधीतून रस्त्याचे कामे करूनही रस्ते खड्डेमय झाल्याने, महापालिका कारभारावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

उल्हासनगर महापालिका आयुक्ताकडून रस्त्यातील खड्ड्यांची पाहणी
उल्हासनगर : शहरातील रस्त्याच्या खड्ड्यावरून वादळ उठल्यावर आयुक्त अजीज शेख, उपायुक्त अशोक नाईकवाडे, दीपक जाधव व शहर अभियंता संदिप जाधव यांनी शहरातील रस्त्याच्या खड्ड्याची पाहणी केली. संततधार पाऊस असल्याने, खड्डे तात्पुरत्या स्वरूपात दगड, रेती व मातीने भरण्याचे आदेश दिले आहे.
उल्हासनगर महापालिका, एमआयडीसी व शासनाच्या विविध निधीतून रस्त्याचे कामे करूनही रस्ते खड्डेमय झाल्याने, महापालिका कारभारावर सर्व स्तरातून टीका होत आहे. मनसेने रस्त्यातील खड्डे विथ सेल्फी स्पर्धेचे आयोजन केल्याने, महापालिका आयुक्त अजीज शेख, उपायुक्त अशोक नाईकवाडे, दिपक जाधव व शहर अभियंता संदीप जाधव यांनी शहरातील रस्ते खड्ड्याची पाहणी मंगळवारी दुपारी केली. यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी शहर अभियंता संदीप जाधव यांना रस्त्यातील खड्डे भरण्याचे आदेश दिले. मात्र संततधार पाऊस असल्याने खड्डे तात्पुरत्या स्वरूपात दगड, रेती व मातीने भरण्याचे आदेश दिले आहे.
शहरात पावसाने उघडीप दिल्यास, अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम व दुरुस्ती सर्वप्रथम सुरू करण्याचे आश्वासन शहरवासियाना दिले. यावेळी रस्त्यातील खड्ड्याचे खड्डा विथ सेल्फी स्पर्धा करणारे मनसेचे पदाधिकारी मनोज शेलार उपस्थित होते. शासनाकडून आलेल्या ४६ कोटीच्या मूलभूत सुविधेसाठी आलेल्या निधीतील कामाचा आढावा आयुक्तांनी घ्यावा. अशी मागणीही होत आहे.