कामगार मृत्यूप्रकरणी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल करा, आयोगाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:25 AM2019-06-12T00:25:43+5:302019-06-12T00:26:28+5:30

आयोगाचे निर्देश : वारसांना मिळाले काम

Insert the 'Atrocity' on the death of workers, the commission's instructions | कामगार मृत्यूप्रकरणी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल करा, आयोगाचे निर्देश

कामगार मृत्यूप्रकरणी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल करा, आयोगाचे निर्देश

googlenewsNext

ठाणे : ढोकाळी भागात सेफ्टिक टँकची स्वच्छता करताना गुदमरून सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी ठाणे महापालिकेसह पोलिसांची मंगळवारी चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर मृतांच्या नातेवाइकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी ठाणे महापालिकेने कंत्राटी पद्धतीवर रोजगार प्राप्त करून दिला. त्याचे नियुक्तीपत्र मृतांच्या नातेवाइकांना हाथीबेड यांच्या हस्ते व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत दिले.

ठाणे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांवर होणाºया अन्याय व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ते ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी १० मे रोजी ठाण्यातील ढोकाळीनाका येथील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झेरिया इमारतीच्या सेफ्टिक टँक अर्थात मलनि:स्सारण केंद्राचे (एसटीपी प्लांट) सफाई काम खासगी ठेकेदाराला दिले होते. या कामासाठी दुपारी आठ सफाई कामगार एसटीपी प्लांटमध्ये उतरले होते. यावेळी विषारी वायूची बाधा होऊन दुर्दैवाने अमित पुहाल (२०), अमन बादल (२१), अजय बुमबक (२४) या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. आयोगाने याची गाभीर्याने दखल घेऊन मंगळवारी जिल्हा नियोजन भवनात पार पडलेल्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने या विषयाला वाचा फोडून या प्रकरणातील दोषींवर पोलिसांनी काय कारवाई केली, कोणते गुन्हे दाखल केले, याचा आढावा घेतला. तसेच या प्रकरणार आरोपींवर गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल हाथीबेड यांनी केला. तेव्हा अ‍ॅट्रासिटी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात विधि विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पालिकेने या मृतांच्या नातेवाइकांच्या हाताला काम मिळावे यासाठी कंत्राटी पद्धतीवर रोजगार प्राप्त करून दिला आहे. त्याचे नियुक्ती पत्र मृतांच्या नातेवाईकांना हाथीबेड यांच्या हस्ते व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत दिले.

प्रत्येक पोलीस ठाण्यात सफाई कामगार नेमावा

जिल्ह्यातील शहर पोलीस आयुक्तालयातील ३६ पोलीस ठाण्यांमध्ये अवघे २७ सफाईकामगार आहेत. त्यापैक ी जास्त सफाईकामगार शहर पोलीस मुख्यालयात असल्याने पोलीस ठाण्यात सफाईकामगारांची कमतरता आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात एक सफाईकामगार नेमावा, अशी सूचना करून पोलीस प्रशासनाने त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करावा, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी मंगळवारी ठाण्यात झालेल्या आढावा बैठकीत दिले.
 

Web Title: Insert the 'Atrocity' on the death of workers, the commission's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.