शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

आठ रस्त्यांच्या कामातील खर्चाची चौकशी; कोकण विभागीय आयुक्त महिनाभरात देणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 09:18 IST

मीरा-भाईंदरमधील कामे

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने अल्ट्रा व्हाइट थिन टॉपिंग अर्थात यूटीडब्ल्यूटी पद्धतीने आठ रस्त्यांसाठी अंदाजित खर्चापेक्षा तब्बल १६ कोटी ९५ लाख ६० हजार रुपये इतक्या जास्त दराने दिलेले ठेके आणि रस्त्यांच्या कामांचा निकृष्ट दर्जा, याच्या चौकशीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. कोकण विभागीय आयुक्तांनी महिनाभरात आपला चौकशी अहवाल सरकारला सादर करायचा आहे. सत्ताधारी भाजपला हा मोठा धक्का असून `लोकमत`ने सदर रस्त्यांबाबत बातमी दिल्यावर आ. प्रताप सरनाईक यांनी शासनाला पत्र देऊन चौकशीची मागणी केली होती.

अल्ट्रा व्हाइट थिन टॉपिंग अर्थात यूटीडब्ल्यूटी पद्धतीने कमी खर्चात व कमी वेळेत रस्ते टिकाऊ बनवण्यात येत असल्याचा दावा मीरा-भाईंदर महापालिकेने केला होता. प्रत्यक्षात पालिकेनेच तयार केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा तब्बल ३० टक्के जास्त दराने ठेके दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे कामांची मुदत संपूनदेखील बहुतांश रस्ते वेळेत पूर्ण केले नाहीत.भाईंदर पूर्व, स्व. प्रफुल्ल पाटील चौक ते विमल डेअरीपर्यंतच्या रस्त्याचे काम २९.९० टक्के जास्त दराने रिद्धिका एंटरप्रायझेसला दिले. सिल्व्हर पार्क ते सृष्टी रस्त्याचे काम देव इंजिनीअर्सला २९.६० टक्के जास्त दराने दिले गेले.

मीरा रोड पूर्व, साईबाबानगर ते शीतलनगर रस्त्याचे काम २३.५० टक्के जास्त दराने श्रीजी कन्स्ट्रक्शनला दिले. शांतीनगर सर्कल ते नयानगर पोलीस चौकी रस्त्याचे काम २५.३० टक्के जास्त दराने श्रीजी कन्स्ट्रक्शनला दिले. नरेंद्र पार्क ते उड्डाणपूलपर्यंतच्या रस्त्याचे काम २८.५० टक्के जास्त दराने श्रीजी कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. मीरा रोड रेल्वेस्थानक ते भक्तिवेदान्त रस्त्याचे काम सुमारे ३० टक्क्यांनी वाढवून गजानन कन्स्ट्रक्शनला दिले.

भाईंदर पूर्वेचे पालिका क्रीडासंकुल ते ७११ हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याचे काम २२.६५ टक्के जास्त दराने गजानन कन्स्ट्रक्शनला दिले गेले. तर, दीपक रुग्णालय ते सेव्हन इलेव्हन शाळेपर्यंतच्या रस्त्याचे काम २९.९० टक्के जास्त दराने ए.आय.सी. इन्फ्रास्ट्रक्चरला दिले आहे.या आठ रस्त्यांच्या कामांसाठी पालिका अंदाजपत्रकानुसार ६२ कोटी ८३ लाख ३१ हजार ४८८ रुपये इतका खर्च अपेक्षित होता. परंतु, प्रत्यक्षात पालिकेने ठेकेदारांना तब्बल १६ कोटी ९५ लाख ५९ हजार ५३६ वाढवून दिल्याने रस्त्यांच्या कामांचा खर्च तब्बल ७९ कोटी ७८ लाख ९१ हजार इतका झाला.

इतके जास्त पैसे देऊनदेखील कामे रखडली. शिवाय, रस्त्यांना ठिकठिकाणी तडे गेले. वरचे सिमेंट उडाले आहे. रस्त्याचा समतोल साधलेला नाही. मुख्य नाके-चौक या ठिकाणी सिमेंटऐवजी डांबरीकरण केले आहे. एकूणच कामात तांत्रिक बाबी व साहित्याचा दर्जा आदी मध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप होत होते.

लोकमतने या बाबतचे वृत्त देताच प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रारी करून ८ रस्त्यांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. सरनाईक यांनी या प्रकरणी शासनाकडे पाठपुरावा चालवला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील सदर रस्ते कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत शासनकडून चौकशी लावणार असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते. 

शासनाने देखील सरनाईक यांनी केलेल्या रस्ते कामातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. अवर सचिव नवनाथ वाठ यांनी पत्र काढून कोकण विभागीय आयुक्तांकडे चौकशी सोपवली आहे. कोकण आयुक्तांनी एका महिन्याच्या आत या रस्ते कामांची चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्यास कळवले आहे. तसेच महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांना देखील या प्रकरणातील सर्व कागदपत्रे कोकण विभागीय आयुक्तांना देण्याचे निर्देश दिले आहेत.

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर