चार नगरसेवकांची चौकशी
By Admin | Updated: November 8, 2015 00:01 IST2015-11-08T00:01:30+5:302015-11-08T00:01:30+5:30
बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला, राष्ट्रवादी नेते तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते

चार नगरसेवकांची चौकशी
ठाणे : बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला, राष्ट्रवादी नेते तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि अपक्ष सुधाकर चव्हाण या चौघा नगरसेवकांची पोलिसांनी सहायक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांच्या कार्यालयात शनिवारी कसून चौकशी केली.
चौघांना मुंबई उच्च न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करून वर्तकनगर पोलिसांत हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांचा पासपोर्ट, मोबाइल फोन जमा करून ठाणे पालिका मुख्यालयात प्रवेश करण्यास न्यायालयाने बंदी घातली. ते सहायक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात हजर झाले असता ही चौकशी करण्यात आली. शुक्रवारी सेना नगरसेवक नरेश म्हस्के यांनीही पोलिस ठाण्यात जाऊन जवाब नोंदवला. (प्रतिनिधी)