दांडीबहाद्दर ग्रामसेवकाची चौकशी
By Admin | Updated: January 25, 2017 04:46 IST2017-01-25T04:46:56+5:302017-01-25T04:46:56+5:30
तालुक्यातील केल्हे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संदीप साळुंखे पंचायतीमध्ये येतच नसल्याने विकासकामे रखडली असल्याने

दांडीबहाद्दर ग्रामसेवकाची चौकशी
अनगाव : तालुक्यातील केल्हे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संदीप साळुंखे पंचायतीमध्ये येतच नसल्याने विकासकामे रखडली असल्याने अशा दांडीबहाद्दर ग्रामसेवकाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आमदार शांताराम मोरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
केल्हे ग्रामपंचायतीत १०० टक्के आदिवासी लोकवस्ती असून ‘पेसा’अंतर्गत असणारी पंचायत आहे. या पंचायतीवर नेमलेले ग्रामसेवक हे गैरहजर राहत असल्याने नागरिकांना सरकारी कामाकरिता लागणारी कागदपत्रे मिळत नसल्याच्या तक्र ारी ग्रामस्थांनी केल्या होत्या. त्याची दखल घेत व विकासकामांची पाहणी करण्यासाठी केल्हे ग्रामपंचायतीस भेट दिली असता ग्रामसेवक गैरहजर होते. फोनही उचललाही नाही. नंतर, साधी विचारपूसही ग्रामसेवकाने केली नसल्याचा आरोप मोरे यांनी गटविकास अधिकारी व ग्रामविकासमंत्र्यांच्या पत्रात केला आहे. या ग्रामसेवकाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. (वार्ताहर)