जखमी कामगार रुग्णालयातच

By Admin | Updated: April 24, 2017 23:58 IST2017-04-24T23:58:13+5:302017-04-24T23:58:13+5:30

दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या कामगाराच्या उपचारावरील खर्च दोन महिने उलटले, तरी न देणाऱ्या जांभूळवाड येथील

The injured workers are in the hospital | जखमी कामगार रुग्णालयातच

जखमी कामगार रुग्णालयातच

शहापूर/आसनगाव : दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या कामगाराच्या उपचारावरील खर्च दोन महिने उलटले, तरी न देणाऱ्या जांभूळवाड येथील अल्फाड गोट फार्महाउसच्या व्यवस्थापनाविरोधात येथील लाइफ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवीण कांगणे यांनी अखेर पोलिसांत तक्रार केली आहे. जखमी कामगार परप्रांतातील असून त्याच्याजवळ नजीकचे नातेवाईक नसल्याने आणि ज्या फार्महाउसवर तो काम करतो, त्या व्यवस्थापनाने दोन महिन्यांपासून त्याच्याकडे ढुंकूनही न पाहिल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडत चालल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अपघातानंतर फार्महाउसचे व्यवस्थापक रमजान यांनी कितीही खर्च झाला तरी चालेल, तुम्ही दवाउपचार करा. आम्ही होणारा खर्च देऊ, असे सांगितले होते. मात्र, हा उपचाराचा खर्च तर सोडाच, परंतु दोन महिने उलटले तरी त्यास बघण्यासाठीही कुणीच न फिरकल्याने डॉक्टर कांगणे यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.
यासंदर्भात किन्हवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेखर डोंबे म्हणाले की, अपघातासंदर्भात गुन्हा नोंदवला असून त्याची चौकशी सुरू आहे. आम्ही फार्महाऊसशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचे रुग्णालयाचे बिल वा वेतना संदर्भातील प्रश्न कामगार कायद्यांतर्गत असल्याने त्यात आम्ही काहीच करू शकत नाही. तर, गोट फार्महाउसचे मालक आणि व्यवस्थापकांशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)

Web Title: The injured workers are in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.