शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षावर वृक्ष पडून झालेल्या अपघातात बाप, लेक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 17:49 IST

रिक्षावर वृक्ष पडून झालेल्या दुर्देवी अपघातात उल्हासनगरचे बाप, लेक दोघे जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३.४६ च्या सुमारास ठाण्यात घडली. हे दोघेही पासपोर्टच्या कामासाठी ठाण्यात आले होते. दरम्यान या घटनेनंतर शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देदोघेही उल्हासनगचे रहिवासीधोकादायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर

ठाणे - वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतांना बुधवारी दुपारी रिक्षावर वृक्ष पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. या घटनेत सुदैवाने रिक्षा चालक बचावला आहे. या घटनेमुळे शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिनाभरात अशा प्रकारे वृक्ष पडून झालेल्या अपघातात पाच ते सहा जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.                   या घटनेत राजेंद्र विश्वकर्मा (५१) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांचा मुलगा योगेश विश्वकर्मा (१८) हा गंभीर जखमी झाला आहे. या दोघांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही उल्हासनगर भागात राहणारे असून ते बुधवारी ठाण्यात पासपोर्टच्या कामासाठी आले होते. यावेळी त्यांनी रिक्षा पकडून पासपोर्ट आॅफीसकडे जात होते. रिक्षा वागळे इस्टेट भागातील एमटीएनएलच्या कार्यालयाजवळ आली असता, त्या ठिकाणी असलेला भलामोठा वृक्ष या रिक्षावर पडला. त्यावेळेस रिक्षा चालक श्रीराम यादव यांच्या बाजूला योगेश बसला होता. त्याच्या डोक्याला या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. तर मागील सिटवर त्याचे वडील राजेंद्र बसले होते. त्यांच्या हाताला दुखापत झाली असून या दोघांनाही उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातातून रिक्षा चालक सुदैवाने बचावला आहे.              दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन विभागाचे पथक दाखल झाले. त्यानंतर वृक्ष रस्त्यातून हटविण्यात आला आहे. परंतु या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात आजच्या घडीला १५० च्या आसपास धोकादायक वृक्ष असल्याची माहिती सुध्दा यापुर्वीच समोर आली आहे. तर मागील महिना भरात वृक्ष पडून पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाAccidentअपघात