जखमी दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:27 IST2021-07-02T04:27:33+5:302021-07-02T04:27:33+5:30
मुंब्राः हनाने धडक दिल्यामुळे गंभीर झालेल्या धनराज मठाधिपती (५६) यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ते नवी मुंबईतील ऐरोली भागातील ...

जखमी दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंब्राः हनाने धडक दिल्यामुळे गंभीर झालेल्या धनराज मठाधिपती (५६) यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ते नवी मुंबईतील ऐरोली भागातील सेक्टर नंबर १९ मधील रेम्बो अपार्टमेंटमध्ये राहात होते. २६ जूनला मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर मोरी भागातील रस्त्यावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला मागून ट्रकने धडक दिल्यामुळे त्यांचे दुचाकीवरील संतुलन बिघडल्यामुळे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले होते. याबाबत मयूर बाविस्कर यांनी बुधवारी शीळ-डायघर पोलिसांत केलेल्या तक्रारीवरून ट्रकचालक मो.नियाज खान याला अटक केली असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पी. डी. गव्हाणे यांनी लोकमतला दिली.