जैवविविधता संवर्धनासाठी महापालिका घेणार पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:21 IST2019-06-08T00:21:43+5:302019-06-08T00:21:50+5:30
राज्य वनसंरक्षण समितीचे सदस्य किरण शेलार यांच्यासह प्रदीप पातार्डे, भाऊ काटदरे, डॉ. दिनेश विनेरकर, निकित सुर्वे आदी तज्ज्ञांसोबतच्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला.

जैवविविधता संवर्धनासाठी महापालिका घेणार पुढाकार
ठाणे : ठाणे शहरातील जैवविविधतेचा ठेवा जतन करावा तसेच त्यांचे चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यासाठी आवश्यक त्या शास्त्रोक्त पद्धतीने उपाययोजना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका पुढाकार घेणार आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी हा निर्णय घेतला. राज्य वनसंरक्षण समितीचे सदस्य किरण शेलार यांच्यासह प्रदीप पातार्डे, भाऊ काटदरे, डॉ. दिनेश विनेरकर, निकित सुर्वे आदी तज्ज्ञांसोबतच्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जैवविविधतेची माहिती घेणे, त्या माहितीची मांडणी करणे आणि त्यानंतर त्याचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा ठेवा कसा वृद्धिंगत करता येईल, याबाबत कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.