दिवाळीत फुलांना महागाईची झळाळी
By Admin | Updated: November 10, 2015 23:37 IST2015-11-10T23:37:42+5:302015-11-10T23:37:42+5:30
ऐन दिवाळीत आवक घटल्याने व मागणी प्रचंड वाढल्याने फुलांचे भाव चार पटीने वाढलेले आहेत. मागील आठवड्यात ६० रुपये किलोने मिळणारा झेंडू या आठवड्यात २०० रुपये किलोने मिळत आहे

दिवाळीत फुलांना महागाईची झळाळी
भाग्यश्री प्रधान, ठाणे
ऐन दिवाळीत आवक घटल्याने व मागणी प्रचंड वाढल्याने फुलांचे भाव चार पटीने वाढलेले आहेत. मागील आठवड्यात ६० रुपये किलोने मिळणारा झेंडू या आठवड्यात २०० रुपये किलोने मिळत आहे. तर २० रुपयाला १० याप्रमाणे मिळणारी जरबेराची फुले १०० रुपयाला १० याप्रमाणे मिळत आहेत. ही सर्वच फुले कलकत्ता, नाशिक, बंगळूर, जालना, लासलगाव, चिपळूण आदी ठिकाणाहून आणल्याचे विक्रेत्यांनी नमूद केले.
दसऱ्यानंतर ती स्वस्त झाली होती. मात्र, वसुबारस झाल्यानंतर ते वाढले आहेत. अवकाळी पाऊस, प्रचंड उष्मा, वाढती आर्द्रता या सर्व नैसर्गिक परिस्थितीमुळेही फुले नष्ट होण्याचे प्रमाण वाढून आवक घटल्याने फुलांचे भाव चढे राहिले आहेत. ते दिवाळी संपेपर्यंत असेच राहतील.