शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारत आर्थिक मंदीच्या गर्तेत नाही - भातखळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 23:52 IST

राज्यात युतीला २२० हून अधिक जागांवर विजय संपादित करण्यात यश मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाणे : जागतिक स्तरावर आर्थिक मंदी आल्याने त्याचा परिणाम भारतावरही झाला आहे. परंतु, भारत मंदीच्या गर्तेत सापडलेला नसल्याचा दावा भाजपचे प्रदेश महासचिव अतुल भातखळकर यांनी केला. तसेच केंद्रातील भाजप सरकारने देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय घेतले आहेत, त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात युतीला २२० हून अधिक जागांवर विजय संपादित करण्यात यश मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.भाजपच्या ठाणे-कोकण विभागाच्या मीडिया सेंटरचा शुभारंभ भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, गटनेते नारायण पवार, मिलिंद पाटणकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ठाणे आणि कोकण भागात सर्वच्या सर्व ३९ जागा जिंकू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. सध्या मागील १०० दिवसांत भाजप आणि मित्रपक्षाने मिळून ज्या वेगाने मोदी सरकारने जनतेच्या हिताची कामे केली आहेत, त्याचा फायदा नक्कीच या निवडणुकीत मिळेल. तसेच जागतिक स्तरावर मंदी असल्याने त्याचा फटकाही भारताला बसला आहे. मात्र, आर्थिक मंदीच्या गर्तेत भारत अडकलेला नाही. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही विकासाचा स्तर हा चार ते साडेचार टक्के होता. आता मोदी सरकारच्या काळात स्तर चांगल्या म्हणजेच पाच टक्कयांवर असल्याचे त्यांनी सांगितले.कळवा-मुंब्रा किंवा भिवंडीतील मतदारसंघ असोत, या सर्वच ठिकाणी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या जागा वाढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना आणि भाजपची युती होईल का, असा सवाल त्यांना विचारला असता, युती १०० टक्के होणार असून त्याची घोषणा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे करतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.शरद पवारांना नैराश्यपुलवामा हल्ल्यासंदर्भात राष्टÑवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा वक्तव्य केले असल्याने त्याचा काय परिणाम होईल, असा सवाल त्यांना केला असता, पवार यांना नैराश्य आले असल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्ये केली जात असल्याचे भातखळकर यांनी सांगितले. येत्या काळात राष्टÑवादीचा पूर्णपणे सफाया झालेला असेल आणि तेच पक्षात शिल्लक राहिलेले असतील, असाही टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :BJPभाजपा