शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

अंबरनाथ-बदलापूरसाठी वाढीव पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 3:17 AM

कुळगाव - बदलापूर नगरपरिषदेच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी शासनाने या शहरांसाठी वाढीव पाणी मंजूर केले आहे.

पंकज पाटील।बदलापूर/अंबरनाथ : कुळगाव - बदलापूर नगरपरिषदेच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी शासनाने या शहरांसाठी वाढीव पाणी मंजूर केले आहे. सोबत अंबरनाथ शहरासाठी देखील वाढीव पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. बदलापूरसाठी २६ तर अंबरनाथसाठी २४ दशलक्ष लीटर्स पाणी देण्यात येणार आहे. दोन्ही शहरांची एकत्रित पाणी पुरवठा योजना असल्याने दोन्ही शहरांना मिळून ५० दशलक्ष लीटर्स जास्त पाणी मिळणार आहे. हे पाणी बारवी धरणातून उपलब्ध होणार आहे.बारवी धरणाची उंची वाढल्यावर या धरणात निर्माण झालेला अतिरीक्त पाणी साठा आपल्याला उपलब्ध व्हावा, यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिका आणि नगरपालिकांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवले होते. या पाण्याचे नियोजन कशा प्रकारे करावे याबाबत तीन वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू होती. तसेच बारवी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्नही निकाली निघत नसल्याने पाण्याचे वाटप थांबवण्यात आले होते.आजच्या घडीला बदलापूरसाठी जीवन प्राधिकरणामार्फत ४० दशलक्ष लीटर्स पाणी पुरवठा केला जातो. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या पाहता हा पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे बदलापूरला अतिरिक्त पाण्याची गरज गरज भासत होती. बारवी धरणाच्या उंची वाढविण्याच्या कामानिमित्ताने बदलापूरला अतिरीक्त पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र या धरणातून नेमके किती पाणी मिळणार याबाबत कोणालाच कल्पना नव्हती.दुसरीकडे अंबरनाथ शहरासाठी २४ दशलक्ष लीटर्स पाणी मंजूर केले आहे. अंबरनाथची पाणी पुरवठा योजना ही जीवन प्राधिकरण चालवत असल्याने हे अतिरिक्त पाणी देखील प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात येणार आहे.अंबरनाथ शहराला नियमितरित्या ५५ दशलक्ष लीटर्स पाणी पुरवठा नियमित करण्यात येत आहेत. मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आणि पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे हा पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे वाढलेल्या पाणी साठ्यामुळे भविष्यातील अंबरनाथच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.अंबरनाथ आणि बदलापूरचे एकूण ५० दशलक्ष लीटर्स पाणी हे जीवन प्राधिकरणाकडे येत असल्याने आता या पाण्याचे नियोजन करून जीवन प्राधिकरण बदलापूरसाठी उल्हास नदीतून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अंबरनाथला पाणी पुरवठा करण्यासाठी एमआयडीसीकडून येणाऱ्या पाण्याचा वापर करणार आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेतील त्रुटी कमी होण्यास मदत होणार आहे.बारवी धरणातून पाणी उचलण्यासाठी दोन्ही पालिकांना पाण्याचे आरक्षण मंजूर केलेले असले तरी त्या पाण्याची उचल कधी करण्यात येईल, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पाण्याचे आरक्षण वाढवून मिळालेले असले तरी अजूनही वाढीव पाण्याची लागलीच गरज भासणार नाही.टप्प्याटप्प्याने या पाण्याचा वापर होणार असल्याने लागलीच वाढीव पाण्याचे करणार काय हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. अंबरनाथ आणि बदलापूरसाठी एकूण ५० दशलक्ष लीटर्स पाणी मंजूर झालेले असले तरी सद्यस्थितीत किती वाढीव पाणी लागणार आहे हे प्राधिकरणाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.>अंबरनाथ आणि बदलापूरसाठी एकूण २५ दशलक्ष लीटर्स पाण्याची मागणी केली होती. मात्र, बदलापूर शहर झपाट्याने वाढत असल्याने दोन्ही शहरांसाठी एकत्रित २५ दशलक्ष लीटर्स पाणी न मागता, बदलापूरसाठी स्वतंत्र २६ दशलक्ष लीटर्स पाण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे आज बदलापूरला स्वतंत्र २६ आणि अंबरनाथला स्वतंत्र २४ दशलक्ष लीटर्स पाणी मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांना अपेक्षेपेक्षा जास्त पाणी मिळनार आहे. - किसन कथोरे, आमदार, मुरबाड मतदार संघ>वितरण व्यवस्था योग्य हवीबारवी धरणात उंची वाढल्याने धरणात निर्माण झालेला ४८८ दशलक्ष लीटर्स अतिरिक्त पाण्यातून काही शहरांसाठी पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे.त्यात अंबरनाथ शहरासाठी २४ दशलक्ष लीटर्स अतिरिक्त पाणी मंजूर करण्यात आले आहे. तर बदलापूर शहरासाठी २६ दशलक्ष लीटर्स पाणी मंजूर करण्यात आले आहे.यामुळे पुढील २० वर्षांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. मात्र, वितरण व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास पाण्याचा प्रश्न हा बदलापूरला त्रासदायक ठरणार आहे.