शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghatkopar Hording Collapse: चौघांचा मृत्यू, ५१ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
2
KKRचा संघ QUALIFIER 1 साठी पात्र, LSG चे आव्हानं संपल्यात जमा! अहमदाबादहून Live Updates 
3
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
4
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
5
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
6
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
7
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
8
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
9
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
11
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
12
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
13
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
14
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
15
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
16
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
17
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
18
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
19
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
20
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला

नवी मुंबई कचरा वाहतूक कंत्राटदारास वाढीव रक्कम; हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:50 AM

कंत्राट सुरू होण्याच्या आदल्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी २०१५ मध्ये राज्य सरकारने कचरा गोळा करणाऱ्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ केली होती.

मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कचरा गोळा करून त्याची वाहतूक करण्याचे कंत्राट दिलेल्या मे. ए.जी. एन्व्हायर्नो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.लि. या कंत्राटदारास कामगारांना वाढीव किमान वेतन देण्यासाठी येणाऱ्या वाढीव खर्चाची प्रतिपूर्ती महापालिकेने कंत्राटात ठरलेल्या रकमेहून अधिकची रक्कम देऊन करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.या कंत्राटदाराने ९ मार्च २०१५ पासून काम सुरू केले. त्यांचे कंत्राट सात वर्षांसाठी आहे. खरेतर, हे कंत्राट सुरू होण्याच्या आदल्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी २०१५ मध्ये राज्य सरकारने कचरा गोळा करणाºया कामगारांच्या किमान वेतनात वाढ केली होती. परंतु, याची माहिती सरकारने महापालिकेस सुमारे वर्षभरानंतर म्हणजे फेब्रुवारी २०१६ मध्ये कळवली.निविदा भरली तेव्हा कंत्राटदारास किमान वेतन वाढले आहे, याची कल्पना नसल्याने त्याने पूर्वीच्याच वेतनानुसार हिशेब करून निविदा दिली होती. सरकारकडून वाढीव वेतनाची अधिसूचना लागू करण्याचे कळवण्यात आल्यानंतर महापालिकेने या कंत्राटदारासही कामगारांना सुधारित दरानुसार वेतन देण्याचे आदेश दिले.यातून अनेक महिने वाद सुरू राहिला. कंत्राटदाराचे म्हणणे असे होते की, महापालिका सभेने सर्व कंत्राटांना सुधारित किमान वेतन लागू करण्याची मंजुरी दिली असल्याने आपल्यालाही त्यानुसार रक्कम वाढवून द्यावी. पण, प्रशासनाने यास नकार दिला. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, श्रमिक सेना व समाज समता कामगार संघ या संघटनांच्या पुढाकाराने कंत्राटदाराच्या कामगारांनी संप पुकारला. दुसरीकडे कामगारांना वाढीव वेतन न दिल्यास दरमहा कंत्राटापोटी देय असलेल्या रकमेतून तेवढी रक्कम वळती करून घेण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला.या पार्श्वभूमीवर कंत्राटदाराने स्वत:च्या पदरचे १.५ कोटी रुपये कर्च करून दोन महिने कामगारांना वाढीव वेतन दिले. परंतु, कायमस्वरूपी तोडगा काही निघाला नाही. म्हणून, कंत्राटदाराने न्यायालयात याचिका केली. न्या. राजेंद्र सावंत व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने ती मंजूर करून वरीलप्रमाणे आदेश दिला.हिशेब दिल्यावर मिळणार रक्कमन्यायालयाने दिलेला आदेशानुसार कंत्राटदाराने ज्या काळासाठी वाढीव किमान वेतन दिलेले नसेल किंवा देऊनही त्याची महापालिकेकडून प्रतिपूर्ती मिळाली नसेल, त्याचा हिशेब त्याने चार आठवड्यांत महापालिकेस द्यावा. महापालिकेने तो तपासून त्यानुसार पुढील आठ आठवड्यांत जास्तीची रक्कम कंत्राटदारास द्यावी.त्यानंतर महापालिकेने वाढीव वेतनाच्या फरकाची रक्कम कंत्राटदारास दरमहिन्याच्या १५ तारखेपर्यंत चुकती करत राहावे.कंत्राटाच्या उर्वरित काळात वाढीव किमान वेतनानुसार वेतन कामगारांना देण्याची कंत्राटदाराने दिलेली हमीही न्यायालयाने नमूद केली.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट