रमजान महिन्यात लसीकरणाची वेळ वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:37 IST2021-04-03T04:37:16+5:302021-04-03T04:37:16+5:30
मुंब्राः पुढील काही दिवसांनी मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या महिन्यात या धर्माचे अनुयायी सूर्योदयापासून ...

रमजान महिन्यात लसीकरणाची वेळ वाढवा
मुंब्राः पुढील काही दिवसांनी मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या महिन्यात या धर्माचे अनुयायी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास (रोजा) पकडतात तसेच दिवसभर धार्मिक कार्यक्रमात व्यस्त असतात. यामुळे सध्या असलेल्या विहित वेळेत ते लस घेण्यासाठी केंद्रात जाऊ शकत नाहीत. यामुळे लस घेण्याची इच्छा असूनही ते त्यापासून वंचित राहाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे होऊ नये यासाठी मुंब्य्रातील कौसा भागातील मौलाना अबुल कलाम स्टेडियममधील लसीकरणाची वेळ किमान रमजान महिन्यात वाढवून ती सकाळी सात ते रात्री ११ अशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सय्यद अली ऊर्फ भाईसहाब यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.