घरफोडीच्या घटनांत वाढ

By Admin | Updated: January 14, 2017 06:03 IST2017-01-14T06:03:00+5:302017-01-14T06:03:00+5:30

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी दिवसभरात चार घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या. त्यात दोन लाखांचा ऐवज चोरीला गेला.

Increase in burglary cases | घरफोडीच्या घटनांत वाढ

घरफोडीच्या घटनांत वाढ

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी दिवसभरात चार घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या. त्यात दोन लाखांचा ऐवज चोरीला गेला.
यशवंत गायकवाड (रा. नवजीवन सोसायटी, भवानी नगर, कल्याण) शनिवारी बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून दागिने व रोकड असा ४५ हजारांचा ऐवज चोरला. तसेच त्यांचे शेजारी नागेश चिपळूणकर यांच्या घरातून १० हजारांचे दागिने चोरले.
तिसरी घटना भोपर गावात घडली. तेथील माया माळी यांच्या घरातून दागिने व रोकड मिळून ७९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहाडच्या गुरु दर्शन टॉवरमध्ये चौथी घटना घडली. तेथील धन्या नायर बुधवारी कामावर असताना चोरट्यांनी ७० हजारांचे दागिने चोरले. (प्रतिनिधी)

Web Title: Increase in burglary cases