"कोरोनामुळे एक पालक गमावलेल्या बालकांच्या दुसऱ्या पालकांना शासकीय नोकरीत सामावून घ्या"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 17:50 IST2021-06-15T17:48:50+5:302021-06-15T17:50:32+5:30

मिरा भाईंदर शहरातील महिला बालविकास अंतर्गत कामाच्या मागण्यांचे निवेदनही. आ. गीता यांनी  मंत्री ठाकूर यांना दिले.

"Include other parents of children who have lost one parent due to corona in government jobs" | "कोरोनामुळे एक पालक गमावलेल्या बालकांच्या दुसऱ्या पालकांना शासकीय नोकरीत सामावून घ्या"

"कोरोनामुळे एक पालक गमावलेल्या बालकांच्या दुसऱ्या पालकांना शासकीय नोकरीत सामावून घ्या"

मीरारोड - एक पालक गमावलेल्या बालकांच्या दुसऱ्या पालकास शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी आमदार गीता जैन यांनी राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. 

यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कोविड काळात पालकत्व गमावलेल्या बालकांसाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी आमदार गीता जैन यांनी  कोरोनामुळे एक पालक गमावलेल्या बालकांच्या दुसऱ्या पालकास शासकीय सेवेत नोकरी द्यावी अशी विनंती केली. 

तसेच मिरा भाईंदर शहरातील महिला बालविकास अंतर्गत कामाच्या मागण्यांचे निवेदनही. आ. गीता यांनी  मंत्री ठाकूर यांना दिले. त्यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मंत्री ठाकूर यांनी दिल्याचे आ. गीता यांनी सांगितले. 

Web Title: "Include other parents of children who have lost one parent due to corona in government jobs"