रिक्षाचालकाला मारहाण करणा-या चौकडीला अटक, कासारवडवलीनाका येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:37 AM2017-08-20T00:37:03+5:302017-08-20T00:37:06+5:30

The incident occurred in Kasparadavalanka, arrested by a quarry on a rickshaw puller | रिक्षाचालकाला मारहाण करणा-या चौकडीला अटक, कासारवडवलीनाका येथील घटना

रिक्षाचालकाला मारहाण करणा-या चौकडीला अटक, कासारवडवलीनाका येथील घटना

Next

ठाणे : घोडबंदर रोडवर व्यवस्थित कार चालवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून मुंबईतील एका चौकडीने ठाण्यातील रिक्षाचालकाला मारहाण केल्याची घटना कासारवडवलीनाका येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. यामध्ये रिक्षाचालक जखमी झाला असून याप्रकरणी चौकडीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विजय गरेल (३५) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. ते शुक्रवारी सायंकाळी हावरे सिटी येथून कासारवडवलीनाका येथे जात होते. याचदरम्यान, त्यांची रिक्षा प्लॅटिनम रोझा गार्डन येथे आल्यावर त्यांच्यासमोर आलेल्या कारचा चालक संजीलकुमार कोनार हा कार वेडीवाकडी चालवत होता. त्यामुळे विजयना रिक्षा चालवण्यास अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी कार व्यवस्थित चालवण्यास सांगितले. याचाच राग मनात धरू न त्या चौकडीने रिक्षासमोर कार उभी केली. तसेच चालक संजीलकुमार (३०) याने त्यांच्या शर्टची कॉलर पकडली. तर, भावेश मरिअप्पण (२१) आणि अरविंद सिघामनी (२१) यांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच संजीलकुमार याने रोडवरील दगड डोक्यात टाकून विजय यांना दुखापत केली.
या प्रकरणी तिघांसह महेंद्र नाडर (२०) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री त्यांना अटक केली. तसेच ते चौघे मुंबईतील धारावी परिसरात राहणारे असल्याची
माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

Web Title: The incident occurred in Kasparadavalanka, arrested by a quarry on a rickshaw puller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.