शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 14:47 IST

जिल्ह्यातील सर्व कोविड १९ रुग्णांसाठी केंद्रीय रूग्ण व्यवस्थापन प्रणाली असणार आहे.

ठाणे: जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे  यांनी जिल्हयातील सर्व कोविड १९ रुग्णांसाठी केंद्रीय रूग्ण व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीचे उद्घाटन पालकमंत्री  एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते झाले. ठाणे जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या. 

जिल्ह्यातील सर्व कोविड १९ रुग्णांसाठी केंद्रीय रूग्ण व्यवस्थापन प्रणाली असणार आहे. १८०० १२० ५२८२ या टोल फ्री क्रमांकावर ही  सुविधा उपलब्ध आहे. एखाद्या मनपात बेड उपलब्ध नसल्यास जिल्हास्तरावरून दुस या मनपातील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. 

टोल फ्री क्रमांकावर कॉल करून रुग्णांना बेड उपलब्ध होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बेड उपलब्ध झाल्याबाबत रूग्णाला एसएमएसद्वारे सूचना मिळणार आहे. त्यामुळे बेडआभावी उपचार न मिळण्याची समस्या दुर होण्यास मदत होणार आहे. जिल्हा स्तरावर तसेच प्रत्येक मनपा व नगरपालिका स्तरावर २४ तास कंट्रोल रूम कार्यरत असणार आहे.जिल्ह्यातील सर्व सीसीसी, डीसीएचसी व डीसीएच मधील बेड्स उपलब्धतता अद्यावत स्वरूपात एका क्लिकवर उपलब्ध असणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूममध्ये २४ तास कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आले आहे.  नागरिकांनी अपली गैरसोय टाळण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिंदे यांनी केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे