शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विरुद्ध बंगाल 'सामना', माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 12:33 IST

आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टीवरील मैदानात क्रिकेट सामनेच आयोजित करावे : दिलीप वेंगसरकर

ठाणे : ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह हे क्रिकेटसाठी उत्तम अशी खेळपट्टी असलेले मैदान आहे, या मैदानात फक्‌त क्रिकेटच खेळले पाहिजे. उत्तम असे व्यासपीठ ठाण्यातील क्रिकेटप्रेमीना या खेळपट्टीच्या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. अनेक वर्षानंतर या ठिकाणी प्रथम श्रेणीचा सामना होत असून यापुढेही असे सामने येथे खेळविले गेले पाहिजे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेगसरकर यांनी व्यक्त केले. 

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आयो जित केलेल्या  या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन नाणेफेक करुन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तब्बल 25 वर्षानी ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात सी.के. नायडू चषक (प्रथम श्रेणी) हा सामना खेळविला जात आहे. या सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती,  ‍क्रीडा व सांस्कृतिक   समिती सभापती अमर पाटील शिक्षण समिती सभापती  विकास रेपाळे, नगरसेविका परिषा सरनाईक, उपायुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, मुंबई  क्रिकेट असोसिएशनचे सदस्य विहंग सरनाईक, नदीम मेमन, माजी रणजीपटू तुकाराम सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर नरेश म्ह्सके यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहातील क्रिकेटची खेळपट्टी ही नदीम मेमन यांच्या संकल्पनेतून आंतराष्ट्रीय दर्जाची तयार करण्यात आली आहे. तब्बल 25 वर्षांनी या खेळपट्टीवर प्रथम श्रेणीचा हा मुंबई विरुध्द बंगाल सामन्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य विहंग सरनाईक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 5 ते 8 जानेवारी दरम्यान हा सामना खेळविला जाणार आहे. हा सामना पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

बीसीसीआयचे आभार : महापौर नरेश म्हस्के

दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहाची खेळपट्टी  ही आंतराष्ट्रीय दर्जाची तयार करण्यात आली आहे. बीसीसीआयने सी.के.नायडू हा 23 वर्षाखालील  क्रिकेटपटूंचा मुंबई विरुध्द बंगाल असा सामना ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आयोजित केला ही  निश्चितच आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले व बीसीसीआयचे आभार व्यकत केले. 

टॅग्स :thaneठाणेTeam Indiaभारतीय क्रिकेट संघMayorमहापौर