शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलालासह दोघांना अटक, दोन पिडित महिलांची सुटका

By अजित मांडके | Updated: December 9, 2023 22:34 IST

या दोघांच्या तावडीतून दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. 

ठाणे: उल्हासनगरातील सेक्शन २६ परिसरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिला दलालासह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांनी शनिवारी दिली. या दोघांच्या तावडीतून दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. 

उल्हासनगरातील सेक्शन २६ जिजामल वाडयाजवळ एक महिला सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे चौधरी यांच्या पथकाने ८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास जिजामल वाड्याजवळ सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी एका महिला दलाल आणि तिच्या पुरुष साथीदाराने दोन महिलांना शरीर विक्रयासाठी आणल्याचे एका बनावट गिऱ्हाईकाने दिलेल्या इशाऱ्यामुळे उघड झाले.

त्यानंतर या दोन्ही दलालांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध विठ्ठलवाडी  पोलिस ठाण्यात कलम ३७० सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुटका केलेल्या दोन्ही पिडित महिलांना उल्हासनगरच्या  महिला शासकीय सुधारगृहे  वसतिगृहात ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिस