शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

उल्हासनगरात सफाईच्या कामावरून दोघांवर जीवघेणा हल्ला, एकाची मृत्यूशी झुंज, दोघांना अटक

By सदानंद नाईक | Updated: May 25, 2023 16:19 IST

जखमी पैकी सुनील निकम मुंबई येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून उल्हासनगर पोलिसांनी भोला कनोजिया व चिंटू चंडालिया यांना अटक केली.

उल्हासनगर : कॅम्प नं-१, शहाड परिसरात सफाईच्या कामावरून चौघडीने सोमवारी पहाटे ४ वाजता दोघांवर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमी पैकी सुनील निकम मुंबई येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून उल्हासनगरपोलिसांनी भोला कनोजिया व चिंटू चंडालिया यांना अटक केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड परिसरात सफाई कामाच्या वादातून सोमवारी पहाटे ४ वाजता नितीन कनोजिया, भोला कनोजिया, चिंटू चंडालीया व एका अज्ञात सहकार्याने सोनू शर्मा व सुनील निकम यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. उल्हासनगर पोलिसांनी दोघांनाही मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान सुनील निकम यांची तब्येत खालावल्याने, त्याला मुंबई येथे हलविण्यात आले. तेथे सुनील मृत्यूशी झुंज देत आहे.

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात नितीन कनोजिया, भोलू कनोजिया, चिंटू चंडालिया व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला असून चिंटू व भोला यांना पोलिसांनी अटक केली. भोला कनोजिया हा गुंड असून गेल्याच महिन्यात त्याची तडीपारीची शिक्षा संपल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसArrestअटक