उल्हासनगरात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
By सदानंद नाईक | Updated: April 17, 2024 20:35 IST2024-04-17T20:35:15+5:302024-04-17T20:35:51+5:30
१ लाख ३९ हजाराची गावठी कच्ची दारू जप्त.

उल्हासनगरात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
उल्हासनगर : मंगरूळ गाव हद्दीतील गावठी दारूच्या अड्ड्यावर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने हिललाईन पोलिसांच्या मदतीने मंगळवारी दुपारी धाड टाकून दारूचा अड्डा उधवस्थ केला. धाडीत १ लाख ३९ हजार १०० रुपये किंमतीची कच्ची गावठी दारू जप्त केली.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगरूळ गाव परिसरात गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. गुन्हे अन्वेषण विभागाने हिललाईन पोलिसांच्या मदतीने मंगळवारी दुपारी ४ वाजता गावठी दारूवर धाड टाकून अड्डा उद्धवस्त केला. तसेच १ लाख ३९ हजार १०० रुपये किमतीचा कच्चा गावठी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात चंद्रकांत मढवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.