उल्हासनगरात ७ व्या मजल्यावरून महिला पडून गंभीर जखमी, खिडकीची करीत होती सफाई
By सदानंद नाईक | Updated: December 11, 2023 19:48 IST2023-12-11T19:48:23+5:302023-12-11T19:48:47+5:30
कॅम्प नं-५ भाटिया चौकातील महालक्ष्मी टॉवर्स इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून खिडकीची सफाई करतांना खाली पत्र्याच्या घरावर पडली.

उल्हासनगरात ७ व्या मजल्यावरून महिला पडून गंभीर जखमी, खिडकीची करीत होती सफाई
उल्हासनगर : कॅम्प नं-५ भाटिया चौकातील महालक्ष्मी टॉवर्स इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून खिडकीची सफाई करतांना खाली पत्र्याच्या घरावर पडली. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून हिललाईन पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५, भाटिया चौकात महालक्ष्मी टॉवर्स नावाची इमारत असून सातव्या मजल्यावर सोनल सुनीलकुमार तेजवानी या कुटुंबासह राहतात. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान खिडकीची सफाई करतांना त्या लोखंडी ग्रीलसह खाली लोखंडी पत्र्याच्या घरावर पडल्या. या घटनेत सोनल तेजवानी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी पी जगताप यांनी दिली. हिललाईन पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हिललाईन पोलीस करीत आहेत.