शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील बडा नेता शिंदे गटात, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला दिली होती सोडचिठ्ठी, आता शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 12:17 IST

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रावादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटात आणले आहे.

ठाणे/मुंबई - बंडखोरी करत उद्धव ठाकरेंना आव्हान दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांना ४० हून अधिक आमदारांसह १२ खासदार आणि शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत येणाऱ्या समर्थकांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रावादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटात आणले आहे. त्यांची शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गतवर्षी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी बदलेल्या राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा पक्षांतर केले आहे. सुरेश म्हात्रे यांनी काल एकनाथ शिंदेंची भेट घेऊन युती सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर त्यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच नियुक्तीचे पत्रही त्यांना देण्यात आले. यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी गेल्यावर्षी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह ठाणे जिप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही काळाने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र वर्षभरातच त्यांनी पक्ष बदलला आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसbhiwandiभिवंडी