शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेच्या पर्यावरण अहवालात सर्व काही छान छान, ध्वनी प्रदूषण मात्र वाढले

By धीरज परब | Updated: October 5, 2023 09:58 IST

Mira Bhayander Municipal Corporation: मीरा भाईंदर महापालिकेने बुधवारी शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०२२ - २०२३ प्रसिद्ध केला आहे . पालिकेच्या अहवालात हवा , पाणी , पर्यावरण आदी सर्वकाही छान छान असल्याचे म्हटले आहे . ध्वनी प्रदूषण मात्र वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय सुचवले आहेत.

- धीरज परबमीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने बुधवारी शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०२२ - २०२३ प्रसिद्ध केला आहे . पालिकेच्या अहवालात हवा , पाणी , पर्यावरण आदी सर्वकाही छान छान असल्याचे म्हटले आहे . ध्वनी प्रदूषण मात्र वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय सुचवले आहेत.

अहवालात महापालिकेच्या वृक्षा रोपं पासून विविध उपक्रमांची छायाचित्रे समाविष्ट केली आहेत . पर्यावरण अहवालाची पार्श्वभूमी , शहराची संक्षिप्त ओळख , माझी वसुंधरा अभियान , हवा - पाणी - ध्वनी च्या गुणवत्तेचे निरीक्षण आणि मूल्यांकन , घनकचरा व्यवस्थापन , आपत्ती व्यवस्थापन , स्वच्छ हवा कृती आराखडा अंतर्गत निधी चे विनियोजन , पर्यावरण संवर्धन आणि जागरूकता , पर्यावरणाची ठळक वैशिष्ठ्ये आदी प्रमुख मुद्दे निहाय माहिती अहवालात दिली गेली आहे.

शहराचे तापमान दरवर्षी ६ . ८ डिग्री सेल्सियस ने वाढत असून उन्हाळा अधिक उष्ण व तीव्र होत चालला आहे असे नमूद आहे. व्यावसायिक क्षेत्रातील कचरा ४० हजार ५०६ टन तर घरगुती कचरा २ लाख ८१ हजार ८१६ टन जमा झाला आहे . शहराच्या ६ हजार ४७९ हेक्टर पैकी निवासी क्षेत्रासाठी १५१२ हेक्टर अर्थात २३ . ३४ टक्के इतके क्षेत्र वापरणे प्रस्तावित आहे . तर नाविकास क्षेत्र म्हणून ३७६२ हेक्टर म्हणजेच ५८ टक्के ठेवले जाणार आहे. 

शहरातील १२ प्रमुख चौकातील हवेची गुणवत्ता तपासली असता ती समाधानकारक असल्याचे अहवालात नमूद आहे .  घोडबंदर आणि भाईंदर येथील खाड्यांच्या पाण्याची चाचणी केली असता ती सुद्धा गुणवत्ते नुसार योग्य असल्याचे म्हटले आहे . शहरात ध्वनी प्रदूषण मात्र असल्याचे अहवालात मान्य केले असून त्यासाठी १२ ठिकाणी च्या ध्वनी मापनाचे आकडे दिलेले आहेत . त्यामुळे ध्वनी प्रदूषण रोखण्या साठी काही उपाय सांगितले आहेत.

घनकचरा व्यवस्थापन च्या अनुषंगाने कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे . विविध प्रकल्प उभारले आहेत . एका वर्षात ३० हजार ४२२ झाडांची लागवड केली असून आणखी १ हजार वृक्षारोपण प्रस्तावित आहे . इलेक्ट्रिक बस येणार असून स्मशानभूमीतील प्रदूषण रोखण्यासाठी स्क्रबर खरेदी केले आहे . हवा शुद्ध करण्यासाठी फिरती वाहने आहेत.

८० पानाचा पर्यावरण अहवाल कल्याणच्या मनू सृष्टी ह्या पर्यावरण सल्लागार यांनी तयार केला आहे . विशेष म्हणजे आमच्या सर्व अपेक्षे प्रमाणे त्यांनी हा अहवाल तयार केला आहे असे खुद्द महापालिका प्रशासनानेच नमूद करत ठेकेदार संस्थेचे कौतुक केले आहे . उपायुक्त संजय शिंदे हे अहवालाचे संपादक तर सहायक आयुक्त योगेश गुणीजन हे प्रकाशक आहेत . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक