ठाण्यात जखमी गोविंदांची संख्या पोहोचली २३ वर 

By अजित मांडके | Updated: September 8, 2023 18:22 IST2023-09-08T18:20:07+5:302023-09-08T18:22:04+5:30

शहरात रात्री उशिरापर्यंत दहीकाला उत्सवात जखमी झालेल्या एकूण २३ गोविंदा जखमी झाले आहेत.

In Thane, the number of injured Govindas has reached 23 | ठाण्यात जखमी गोविंदांची संख्या पोहोचली २३ वर 

ठाण्यात जखमी गोविंदांची संख्या पोहोचली २३ वर 

ठाणे : शहरात रात्री उशिरापर्यंत दहीकाला उत्सवात जखमी झालेल्या एकूण २३ गोविंदा जखमी झाले आहेत. यामध्ये १३,१६, १७ आणि १८ या वयोगटातील पाच गोंविदा असून उर्वरित गोविंदा हे २० वर्षांवरील आहेत. 

याच बरोबर, जखमी गोविंदांमध्ये १३ ठाणेकर, सहा मुंबईतील, विरारचे दोन आणि नवीमुंबई व कल्याण येथील प्रत्येकी एक - एक गोविंदाचा समावेश आहे. तर जखमींमध्ये प्रामुख्याने गोविंदांच्या हाताला, छातीला, कमरेला दुखापत झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामध्ये एका महिला गोविंदाला तिच्या नातेवाईकांनी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारार्थ नेले असून उर्वरित गोविंदांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
 

Web Title: In Thane, the number of injured Govindas has reached 23