धावत्या चारचाकी गाडीला आग; प्रसंगावधान राखत चालकाने स्वत:ची सुटका केली

By अजित मांडके | Updated: July 17, 2023 09:58 IST2023-07-17T09:58:31+5:302023-07-17T09:58:43+5:30

हा प्रकार समोर आल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या एका बाजूला घेतली.

In thane Fire to a running four-wheeler; The driver managed to free himself | धावत्या चारचाकी गाडीला आग; प्रसंगावधान राखत चालकाने स्वत:ची सुटका केली

धावत्या चारचाकी गाडीला आग; प्रसंगावधान राखत चालकाने स्वत:ची सुटका केली


ठाणे - नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर धावत्या चारचाकी गाडीला सोमवारी सकाळी पावणेसात ते सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही घटना तीन हात नाक्याच्या परिसरात घडली आहे. 

हा प्रकार समोर आल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या एका बाजूला घेतली. तसेच वागळे इस्टेट अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली. तर, त्यांना त्या आगीवर काही मिनिटांत नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकार घडला त्यावेळी चालक हा एकटाच गाडीत होता. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Web Title: In thane Fire to a running four-wheeler; The driver managed to free himself