शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

ठाणे जिल्ह्यात भाजप नव्हे, शिवसेना हाच माेठा भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 15:08 IST

ठाणे, कल्याण सोडणार नसल्याची पदाधिकाऱ्यांची भूमिका

ठाणे :   काही दिवसांपासून ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला असताना, आता शिवसेनेने ठाणे आणि कल्याण हे शिवसेनेचेच बालेकिल्ले असल्याचे भाजपला बजावले आहे.  कोणत्याही परिस्थितीत हे दोन्ही मतदारसंघ आम्ही सोडणार नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. ठाण्यासह मीरा-भाईंदर किंवा कल्याण, अंबरनाथ या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे. जिल्ह्यात शिवसेना हाच मोठा भाऊ असल्याचा दावा शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला.ठाण्यासह कल्याण काबीज करण्यासाठी काही महिन्यांपासून भाजपकडून रणनीती आखली जात आहे. ठाण्यात तर अनेक नावे भाजपचे संभाव्य उमेदवार पुढे आले. कल्याणमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह इतर नेत्यांनी वरचेवर हजेरी लावली होती. त्यामुळे भाजप हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेणार, अशी चर्चा होती. त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वारंवार ठिणगी पडल्याचेही दिसले. भाजपकडून दावा सुरू असताना, शिवसेनेने ठाणे लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट केले .

कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मतदानावर परिणाम    लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडला, तर त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बसू शकतो, अशी शंका शिवसेनेला आहे, तसेच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू शकतो, त्यांची नाराजी तशीच राहिली, तर मतदानावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे

    लोकसभा झाल्यावर विधानसभा आणि पुढे महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करावा लागणार आहे. त्यामुळेच ठाणे आणि कल्याण सोडणे कठीण असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण