ठाण्यात सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडून तरुणी जखमी  

By जितेंद्र कालेकर | Updated: October 9, 2022 21:06 IST2022-10-09T21:06:19+5:302022-10-09T21:06:55+5:30

या घटनेत तन्वी दत्ता चव्हाण ही १८ वर्षीय तरुणी जखमी झाली.

In Thane, a young woman was injured when a slab of plaster fell in a flat | ठाण्यात सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडून तरुणी जखमी  

ठाण्यात सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडून तरुणी जखमी  

ठाणे: घोडबंदर रोड, मानपाडा येथील देवतीर्थ सोसायटीच्या 'बी' विंग  या इमारतीच्या तळ मजल्यावर बी-तीन या सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडल्याची घटना रविवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तन्वी दत्ता चव्हाण ही १८ वर्षीय तरुणी जखमी झाली. तिच्या डोक्याला आणि डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घोडबंदर रोड, मानपाडा येथील अंदाजे २३ वर्षे जुने बांधकाम असलेल्या देवतीर्थ सोसायटीच्या सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडून एक तरुणी 
जखमी झाल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि कर्मचारी, उपअभियंता तसेच कनिष्ठ अभियंता (वर्तकनगर प्रभाग समिती- सार्वजनिक बांधकाम विभाग), वर्तकनगर प्रभाग समिती- अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. यावेळी त्या सदनिकेतील 
धोकादायक झालेले स्लॅबचे प्लास्टर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाºयांनी काढून घेतले आहे. ही इमारत आता सी दोन- ए या धोकादायक वर्गवारीमध्ये  वर्तकनगर प्रभाग समितीने घोषित केले आहे.
 

 

Web Title: In Thane, a young woman was injured when a slab of plaster fell in a flat

टॅग्स :thaneठाणे