अंबरनाथमध्ये बिबट्या शिकारीच्या शोधात; पुन्हा एकदा दर्शन

By पंकज पाटील | Updated: October 10, 2023 19:10 IST2023-10-10T19:09:45+5:302023-10-10T19:10:40+5:30

अंबरनाथच्या नालंबी, चिंचपाडा, वसत, जांभूळ या भागात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वन विभागांनी दिला आहे.

in search of leopard hunting in ambernath sighting once again | अंबरनाथमध्ये बिबट्या शिकारीच्या शोधात; पुन्हा एकदा दर्शन

अंबरनाथमध्ये बिबट्या शिकारीच्या शोधात; पुन्हा एकदा दर्शन

पंकज पाटील, अंबरनाथ: गेल्या वर्षी अंबरनाथ मध्ये बिबट्याने दहशत माजवल्यानंतर तो बिबट्या पुन्हा जुन्नरच्या दिशेने निघून गेला होता मात्र आता पुन्हा एकदा अंबरनाथ मध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने हा बिबट्या नेमका आला कुठून असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. भीमाशंकर अभयारण्यातून गेल्यावर्षी जुन्नर वनक्षेत्र येथून जीपीएस कॉलर असलेला बिबट्या अंबरनाथ मुरबाड आणि बदलापूर परिसरामध्ये वावरताना दिसला होता अनेक शिकारी केल्यानंतर हा बिबट्या पुन्हा घरी परतला होता. सोमवारी रात्री अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात असलेल्या जांभूळ गेस्ट हाऊस परिसरात पुन्हा एकदा बिबट्या नागरिकांच्या दृष्टिक्षेपात पडला आहे. 

बदलापूर आणि वांगणी परिसरात देखील काही महिन्यांपूर्वी असाच एक बिबट्या जंगलात वावरताना दिसला होता त्यामुळे अंबरनाथ बदलापूर वांगणी आणि मलंगड परिसरात असलेल्या डोंगरावर बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढण्याचे दिसत आहे त्यातीलच एक गिफ्ट अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. नागरिकांच्याही हा बिबट्या दृष्टिक्षेपात पडला असून वन विभागाने देखील त्या बिबट्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या नालंबी, चिंचपाडा, वसत, जांभूळ या भागात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वन विभागांनी दिला आहे.

Web Title: in search of leopard hunting in ambernath sighting once again