पंकज पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, अंबरनाथ : नगरपालिका निवडणुका समोर दिसत असताना अंबरनाथमध्ये महायुतीमधील भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील राजकारण तापले आहे. एकमेकांचे नगरसेवक फोडण्याची उभय पक्षात स्पर्धा सुरू आहे. सुरुवातीला भाजपने आणि आता शिंदेसेनेने एकमेकांचे नगरसेवक आपल्या पक्षात घेतले आहेत. त्यामुळे विरोधकांना घाम फोडण्याऐवजी मित्रपक्षच एकमेकांना घाम फोडत असल्याचे चित्र अंबरनाथमध्ये दिसत आहे.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेना आणि भाजप यांना आगामी पालिका निवडणुकीत एकमेकांसोबत युती करण्यात कोणताही रस नाही. युती होणार नसल्यामुळे आता भाजप आणि शिंदेसेनेनी एकमेकांच्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा लावत आहेत. शिंदेसेनेचे नगरसेवक सुरेंद्र यादव यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश देण्यात आला. या घटनेला दोन आठवडे उलटत नाही तोच आता शिंदे सेनेने भाजपच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले.
अशा प्रकारे पक्षप्रवेश
शिंदे सेनेचे पदाधिकारी असलेले दुर्गेश चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेण्यात आला. भाजपची ही नीती शिंदेसेनेच्या जिव्हारी लागली होती.
भाजपने सलग दोन वेळा शिंदेसेनेच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष प्रवेश दिल्यानंतर आता शिंदे सेनेने देखील भाजपच्या नगरसेविका दीपा गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला.
भाजपचे आणखी काही नगरसेवक आणि पदाधिकारी हे शिंदे सेनेच्या वाटेवर असून त्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार आहे मात्र हे नगरसेवक आणि पदाधिकारी नेमके कोण हे अजून स्पष्ट झालेले नाही.
Web Summary : In Ambernath, BJP and Shinde Sena compete to poach corporators ahead of municipal elections. After BJP took Shinde Sena members, Shinde Sena retaliated by inducting BJP corporators, intensifying political tensions within the Mahayuti alliance.
Web Summary : अंबरनाथ में, भाजपा और शिंदे सेना नगरपालिका चुनावों से पहले पार्षदों को तोड़ने की प्रतिस्पर्धा कर रही हैं। भाजपा द्वारा शिंदे सेना के सदस्यों को लेने के बाद, शिंदे सेना ने भाजपा पार्षदों को शामिल करके जवाबी कार्रवाई की, जिससे महायुति गठबंधन के भीतर राजनीतिक तनाव बढ़ गया।