उल्हासनगरातील टॉउन हॉल मधील चर्चा सत्रात, आमदार आयलानी व अधिकारी क्लिन बोल्ड
By सदानंद नाईक | Updated: July 13, 2023 18:48 IST2023-07-13T18:48:18+5:302023-07-13T18:48:27+5:30
आमदार गणपत गायकवाड व किणीकर यांची दांडी

उल्हासनगरातील टॉउन हॉल मधील चर्चा सत्रात, आमदार आयलानी व अधिकारी क्लिन बोल्ड
उल्हासनगर : शहरातील विविध समस्यांवर आमदार कुमार आयलानी यांनी बुधवारी टॉउन हॉल मध्ये बोलविलेल्या चर्चा सत्रात नागरिकांच्या प्रश्नाने आमदार आयलानी व अधिकारी क्लिन बोल्ड झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. नागरिकांनी शहरातील कायदा सुव्यवस्था, शहरातील समस्या आदिवर प्रश्न उपस्थित केले होते.
उल्हासनगरातील कायदा व सुव्यवस्था, पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, विजेचा लपंडाव यांच्यासह इतर समस्या बाबत चर्चासत्राचे आयोजन आमदार कुमार आयलानी यांनी बुधवारी दुपारी ४ वाजता टॉउन हॉल मध्ये आयोजित केले होते. चर्चा सत्राला नागरिक, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, व्यापारी मंडळाचे पदाधिकारी आदीजन उपस्थिती होते. तर त्याच्या समस्यांचा समाधानासाठी आमदार कुमार आयलानी, महापालिका आयुक्त अजीज शेख, प्रांत अधिकारी जयराज कारभारी, पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता धंनजय ओंढेकर तहसीलदार अक्षय ठाकणे, वाहतूक विभाग सहायक पोलिस आयुक्त विनोद पोवार, शहरातील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, शिधावाटप अधीकारी, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांच्यासह महापालिका विभाग प्रमुख उपस्थित होते.
चर्चासत्रात नागरिकांनी शहरातील अवैध बांधकामे, बेकायदा बांधकामे नियमित करणे, शहरातील रस्ते, शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, पाणी टंचाई, आदींबाबत नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार करून आमदार आयलानी यांच्यासह अधिकाऱ्याची बोलती बंद केली होती. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष जमनू पुरसवानी, माजी नगरसेवक महेश सुखरामनी, प्रदीप रामचंदानी, राजू जग्याशी, उल्हासनगर शॉपकिपर अशोषियेशनचे अध्यक्ष दीपक छतलानी यांच्यासह सामजिक संघटना पदाधिकारी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.