येत्या मंगळवारी २५ जून रोजी अंगारकी; २०२७, २०३० मध्ये पुन्हा जूनमध्ये येणार अंगारकी
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 24, 2024 17:11 IST2024-06-24T17:09:17+5:302024-06-24T17:11:03+5:30
येत्या मंगळवारी २५ जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे.

येत्या मंगळवारी २५ जून रोजी अंगारकी; २०२७, २०३० मध्ये पुन्हा जूनमध्ये येणार अंगारकी
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : येत्या मंगळवारी २५ जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. चंद्रोदयाच्यावेळी कृष्ण चतुर्थी असेल तर तो दिवस संकष्टी चतुर्थीचा मानला जातो. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला 'अंगारकी संकष्ट चतुर्थी ' म्हणतात. २०२७, २०३० मध्ये पुन्हा जूनमध्ये तर पुढील वर्षी म्हणजेच २०२५ साली ऑगस्ट महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थी येणार असल्याची माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा.कृ. सोमण यांनी दिली.
गणेशभक्तांसाठी पुढील २१ अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या तारखा-
१. १२ ऑगस्ट २०२५
२. ६ जानेवारी २०२६
३. ५ मे २०२६
४. २९ सप्टेंबर २०२६
५. २२ जून २०२७
६. ८ ऑगस्ट २०२८
७. ५ डिसेंबर २०२८
८. १ मे २०२९
९. २२ जानेवारी २०२३
१०. १८ जून २०३०
११. १ ऑक्टोबर २०३०
१२. २ डिसेंबर २०३१
१३. ३० मार्च २०३२
१४. १७ मे २०३३
१५. ११ ऑक्टोबर २०३३
१६. २८ नोव्हेंबर २०३४
१७. २७ मार्च २०३५
१८. १३ मे २०३६
१९. ९ सप्टेंबर २०३६
२०. ३ फेब्रुवारी २०३७
२१. २७ ऑक्टोबर २०३७
मंगळवार २९ जून रोजी आलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त उपवासाच्या पदार्थांबरोबर खास उपवास थाळी उपहारगृह आणि मराठमोळ्या हॉटेल्समध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत ही थाळी उपलब्ध असेल असे हॉटेल मालक नंदन जोगळेकर यांनी सांगितले. यात उपवासाच्या पदार्थांबरोबर राजगिरा पूरी, उपवास बटाटा भाजी, आमरस उपवास कटलेट, काकडी कोशिंबीर, साबुदाणा पापड या पदार्थांचा समावेश असेल असे जोगळेकर यांनी सांगितले.