अत्याचार करणाऱ्यास त्वरित अटक करा
By Admin | Updated: January 28, 2017 02:40 IST2017-01-28T02:40:55+5:302017-01-28T02:40:55+5:30
पेणकरपाडा येथील महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात एका चौदावर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी

अत्याचार करणाऱ्यास त्वरित अटक करा
मीरा रोड : पेणकरपाडा येथील महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात एका चौदावर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी आरोपीला दोन दिवसांत अटक करा, अन्यथा मोर्चा काढू, असा इशारा स्थानिक नगरसेवकांसह रहिवासी शिष्टमंडळाने काशिमीरा पोलिसांना दिला आहे.
सातवीत शिकणारी १४ वर्षांची मुलगी जवळच्या पालिका स्वच्छतागृहात गेली असता तेथे एका अनोळखी तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. एक महिला शौचास गेली असता तिला ही मुलगी अर्धबेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. अद्याप कोणतेही धागेदोरे मिळालेले नाहीत. दिवसाढवळ्या पालिकेच्या स्वच्छतागृहात घडलेल्या या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या अनुषंगाने स्थायी समिती सभापती प्रभाकर म्हात्रे, नगरसेविका अनिता पाटील, मंदाकिनी गावंड, माजी नगरसेवक आत्माराम गावंड, शिवसेना महिला उपजिल्हा संघटक स्नेहल सावंत, वैशाली खराडे, डोना देसाई, शिल्पा सावंत, प्रमिला लाडे, सुरेश सावंत, लक्ष्मण कांदळगावकर यांच्यासह मुलीचे नातेवाईक तसेच महिलांनी काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सानप यांची भेट घेऊन निवेदन दिले. (प्रतिनिधी)