शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

भिवंडीत पान मसाल्यासह एक कोटींचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदेशीर साठा जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: November 23, 2022 14:55 IST

ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

ठाणे: भिवंडीतील मडक्याचा पाडा भागातून   पान मसाल्यासह एक कोटींचा तंबाखूजन्य पदार्थाची  बेकायदेशीरपणे तस्करी करणाऱ्या  ट्रकसह तंबाखूजन्य पदार्थाचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ठाणे पथकाने जप्त केल्याची माहिती कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी बुधवारी दिली. याप्रकरणी ट्रक चालकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आंबाडी - भिवंडी रोडवर, नारायण फार्मच्या बाजूला, मडक्याचा पाडा, कवाड, या भागातून  ठाणे -मुंबईकडे बेकायदेशीर तंबाखू जन्य पदार्थाचा साठा विक्रीसाठी नेला जात असल्याचे आढळले.

बंदी असलेल्या अन्नपदार्थात विमल पानमसाला, शुद्ध प्लस पानमसाला, व्ही -१ तंबाखू आणि  नावी तंबाखू आदींचा  सुमारे एक कोटी आठ लाख पाचशे वीस रुपयांचा  साठा आढळला. हा साठा तसेच ते वाहून नेणारा ट्रक अन्न व औषध प्रशासन विभागाने ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात  ट्रक चालक  परमेश्वर  ढाकरगे (वय ३७, वर्षे, सध्या रा.  दहिसर मुंबई, मुळ रा. परभणी) याच्यासह सहा जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १८८, २७२, २७३, ३२८  तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६  चे कलम ५९  नुसार २३ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक केल्याप्रकरणी या ट्रकचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच वाहनचालकाचा वाहन परवाना रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे  मंत्री संजय राठोड यांच्या आदेशाने तसेच   अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तअभिमन्यू काळे आणि कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :thaneठाणे