बेकायदा विदेशी बनावट सिगारेटची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:48 IST2021-09-10T04:48:39+5:302021-09-10T04:48:39+5:30

ठाणे : वसंत विहार हिरानंदानी मेडोज येथे एका पानटपरी चालकाने बेकायदा विदेशी बनावटीच्या सिगारेट ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

Illegal sale of foreign counterfeit cigarettes | बेकायदा विदेशी बनावट सिगारेटची विक्री

बेकायदा विदेशी बनावट सिगारेटची विक्री

ठाणे : वसंत विहार हिरानंदानी मेडोज येथे एका पानटपरी चालकाने बेकायदा विदेशी बनावटीच्या सिगारेट ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याच्या टपरीवर चितळसर पोलिसांनी छापा टाकून एक लाख सात हजार रुपयांच्या त्या सिगारेट जप्त केल्या. याप्रकरणी टपरीचालक सुशील सिंह (३४, रा. कॅसलमील, राबोडी) याच्याविरोधात चितळसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

केंद्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून देशी-विदेशी बनावटीच्या सिगारेट पॉकिटावर इंग्रजी अथवा मान्यता प्राप्त भारतीय भाषेत केंद्र शासनाने ठरवून दिलेले योग्य आकाराचे वैधानिक चित्र व वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेटची विक्री करण्यास मनाई असतानाही त्याची विक्री सिंह करत होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

-------

Web Title: Illegal sale of foreign counterfeit cigarettes