ठाणे : न्हावाशेवा येथील रिलायन्स कंपनीतून १६ लाख ३२ हजार रुपये किमतीचे २४ हजार लीटर डिझेल इंदूरमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणा-या शाकीरअली तहिदुल्ला उर्फ वहिदुल्ला (२९, रा. मेवली, फतेहपूर, उत्तर प्रदेश) या टँकरचालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने आनंदनगर चेकनाका भागातून गुरुवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून टँकरसह ३३ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिलीन्हावाशेवा येथील रिलायन्स कंपनीतून मुंबईच्या गोदीतील बंकर्समध्ये वितरित होणाºया डिझेलची बनावट चलनाच्या आधारे इंदूरमध्ये काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी एक टँकर निघाला असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, उपनिरीक्षक विजय उपाळे यांच्या पथकाने ठाण्याच्या आनंदनगर चेकनाका कोपरी भागातून जाणाºया या डिझेल टँकरला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये शाकीरअली याने डिझेल बनावट बिल आणि चलन तयार करून ते इंदूरकडे घेऊन जात असल्याची कबुली दिली.
डिझेलची बेकायदा विक्री, ठाण्यातून एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:53 IST