शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांवर मीरा भार्इंदर मध्ये छापासत्र   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 23:10 IST

शासनाचा महसुल बुडवुन बेकायदेशीरपणे इंटरनेट सेवा पुरवणारया भार्इंदर पुर्व येथील एका कार्यालयावर दुरसंचार विभागाच्या अधिकारयांसह पोलिसांनी छापा मारुन गुन्हा दाखल केलाय.

मीरारोड - शासनाचा महसुल बुडवुन बेकायदेशीरपणे इंटरनेट सेवा पुरवणारया भार्इंदर पुर्व येथील एका कार्यालयावर दुरसंचार विभागाच्या अधिकारयांसह पोलिसांनी छापा मारुन गुन्हा दाखल केलाय. कार्यालयातील डाटा, पावत्या आदी जप्त करुन कार्यालयाला सील ठोक ण्यात आले आहे. शिवाय काशिमीरा, नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील पोलीसांनी छापे टाकले आहेत. या बेकायदा इंटरनेट सेवे मुळे राष्ट्रिय सुरक्षेला धोका होण्याची भिती दुरसंचार विभागाच्या अधिकारयाने व्यक्त केली आहे. तर २०१६ पासुन शाहरात अनेक ठिकाणी बेकायदा इंटरनेट सेवा चालवल्या जात असल्याच्या तक्रारी असताना वेळीच कारवाई न केल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.सहाय्यक अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कार्यालया कडुन या बाबतचे प्रसिध्दी पत्रक देण्यात आले आहे. मीरा भार्इंदर मध्ये दुरसंचार विभागाशी कोणताही रीतसर करारनामा न करता व परवानगी न घेताच इंटरनेट सुविधा पुरवली जात असल्याची माहिती केंद्रिय दुरसंचार विभागाचे दिल्ली येथील महासंचालक सुनिल कुमार यांच्या कडुन ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांना देण्यात आली होती.त्या अनुषंगाने पाटील यांच्या कार्यालयात या बाबत सुनिल कुमार यांच्यासह ब्रिजेश कुमार, संतोषी कुलकर्णी या दुरसंचार विभागातील अधिकारयांसह अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत कदम , सहाय्यक अधिक्षक कुलकर्णी यांची बैठक झाली होती.बैठकीत ठरल्या प्रमाणे कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नया नगर , नवघर व काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईसाठी तीन पथके तयार करण्यात आली होती.सदर पथकाने भार्इंदर पुर्वेच्या आरएनपी पार्क मधील शिवनिकेतन इमारतीत असलेल्या स्टार नेट इंटरनेट ब्रॉड बँड या बेकायदा इंटरनेट पुरवणारया कार्यालयावर छापा टाकला. सदर ठिकाणा वरुन संगणकातील डाटा, पावती पुस्तके, नोंद वह्या आदी जप्त करुन कार्यालय सील केले. २०१६ पासुन भाऊसाहेब कारभारी उगले व वोरटेक्स नेटच्या मालकाने संगनमताने भारतिय दुरसंचार कायद्याचे उल्लंघन करुन ग्राहकांची दिशाभुल करत बेकायदा इंटरनेट सेवा पुरवुन बक्कळ पैसे उकळले आहेत.शासनाशी कोणताही करारनामा वा परवानगी न घेता इंटरनेट पुरवण्याची यंत्रणा उभारली आहे. यातुन शासनाचा महसुल बुडवला आहेच शिवाय राष्ट्रिय सुरक्षेला धोका निर्माण केल्याचे म्हटले आहे. कारण बेकायदा इंटरनेट पुरवणारया यंत्रणे मुळे नेट वापरणारया नागरीकांचा डाटा व माहिती देखील धोक्यात आली असुन देश विरोधी कृत्यासाठी सुध्दा याचा सहज वापर शक्य आहे.या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास सुरु आहे. शहरात अन्य ठिकाणी देखील अशाा बेकायदा इंटरनेट सेवा पुरवणारे कार्यरत असुन त्यांच्यावर देखील छापासत्र सुरु असल्याचे पोलीसांनी सांगीतले.

टॅग्स :Crimeगुन्हाMira Bhayanderमीरा-भाईंदर