शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील प्रदूषणाच्या समस्येकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:01 IST

भिवंडीतील डाइंग व सायझिंगमध्ये वापरण्यात येणारी रसायने, मोती कारखान्यात वापरण्यात येणारी रसायने अशा अनेक कारणांमुळे शहरातील प्रदूषण कमालीचे वाढले आहे.

- पंढरीनाथ कुंभार, भिवंडीभिवंडीतील डाइंग व सायझिंगमध्ये वापरण्यात येणारी रसायने, मोती कारखान्यात वापरण्यात येणारी रसायने अशा अनेक कारणांमुळे शहरातील प्रदूषण कमालीचे वाढले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेचा प्रदूषण नियंत्रण विभाग यांचे या परिस्थितीकडे साफ दुर्लक्ष सुरु आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास भिवंडीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.भिवंडीतील प्रदूषण वाढत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. प्रदूषणकारी कंपन्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. शहरात धाग्यावर व कापडावर प्रक्रिया करणारे सायझिंग व डार्इंग आहेत. त्यापैकी सायझिंगमधील बॉयलर गरम करण्याकरीता कोळशाचा वापर करणे गरजेचे असताना अनेक सायझिंगमध्ये लाकडांचा व टाकाऊ पदार्थांचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे निघणाऱ्या धुरामुळे हवेतील प्रदूषणात वाढ होत आहे. काही डार्इंगमध्ये विजेवरील बॉयलर चालू असल्याने त्याचे हवेतील प्रदूषण कमी असते. मात्र या बाबतची माहिती घेऊन कारवाई करण्यास मंडळाचे अधिकारी तयार नाहीत. प्रदूषण मंडळाच्या कल्याण कार्यालयाच्या क्षेत्रात भिवंडी तालुक्याचा समावेश असून मंडळाचे अधिकारी भिवंडीत फिरकतही नाहीत. डाइंग व सायझिंगमधून निघणारे दूषित पाणी प्रक्रिया करून न सोडल्याने त्याचा परिणामही नागरिकांना भोगावा लागतो. अनेकवेळा हे प्रदूषित पाणी गटारात सोडले जाते. त्या गटाराच्या शेजारी राहणाऱ्यांना वेगवेगळ्या आजारांची बाधा होते. या बाबत नागरिकांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही गटारात दूषित पाणी सोडण्यास मनाई केली जात नाही. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील डार्इंग व सायझिंग मालकांचे स्थानिक पुढाऱ्यांचे अर्थपूर्ण संबध असल्याने त्यांच्याकडून दुर्लक्ष होते. हवेतील आणि पाण्यातील प्रदूषणाची पालिकेच्या प्रदूषण विभागाकडून वरचेवर चाचणी केली जात नाही.शहरात प्लास्टिक दाण्यांपासून मणी बनवणाºया कारखान्यांतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. प्लास्टिक दाण्यापासून मणी बनवताना व बनवलेल्या मण्याला रंग देण्यासाठी करण्यात येणाºया प्रक्रियेदरम्यान विविध रसायनांचा वापर केला जातो. ही रसायने ज्वलनशील असल्याने त्यापासून आग लागण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. तरी देखील शहरात शेकडोच्या संख्येने मोती कारखाने सर्रास सुरू आहेत. या मोती कारखान्यांत काम करणाºया महिला व पुरूषांना रासायनिक प्रक्रियेमुळे विविध आजार होतात. परिसरांतील नागरिकांना दमा व फुफ्फुसाचे आजार होतात. प्लास्टिक मण्यांना रंग लावून झाल्यानंतर त्याची डाय पुन्हा वापरण्यासाठी त्याच्या वरचे रासायनिक थर उघड्या मैदानात नेऊन जाळले जातात. हे काम सुट्टीच्या दिवशी अथवा रात्रीच्या वेळी केले जात असल्याने कोणीही अधिकारी त्या ठिकाणी पोहोचत नाही. काही पोलीस ठाण्यांनी प्रदूषणकारी मोती कारखान्याच्या मालकांना शांतता व मोहल्ला कमिटीवर घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई होत नाही. शहरात कमी रकमेत मजूर मिळत नसल्याने काही मोती कारखान्यांच्या मालकांनी ग्रामीण भागात बस्तान बसवले आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणbhiwandiभिवंडी