सावरकरां बद्दल उद्धव ठाकरेंना आदर आहे तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा -आमदार प्रताप सरनाईक
By धीरज परब | Updated: March 31, 2023 19:54 IST2023-03-31T19:54:45+5:302023-03-31T19:54:45+5:30
मीरारोड - उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे , खासदार संजय राऊत हे स्वातंत्र्य वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँगेस नेते ...

सावरकरां बद्दल उद्धव ठाकरेंना आदर आहे तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा -आमदार प्रताप सरनाईक
मीरारोड -उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे , खासदार संजय राऊत हे स्वातंत्र्य वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँगेस नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रेत सहभागी होतात. दुसरीकडे उद्धव ठाकरे जाहीर सभेत मात्र सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असे सांगतात. त्यांना खरंच सावरकरां बद्दल आदर आहे तर महाविकास आघाडीतून त्यांनी बाहेर पडले पाहिजे असे वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी भाईंदर येथे केले आहे.
मीरा भाईंदर शहरात मी सावरकर गौरव यात्रा २ एप्रिल रोजी दुपारी १२ वा. भाईंदर पश्चिमेच्या सुभाषचंद्र बोस मैदानापासून ते काशीमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे. त्याबाबतची माहिती शुक्रवारी आमदार प्रताप सरनाईक , आमदार गीता जैन, भाजप जिल्हाध्यक्ष रवि व्यास व शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली.
वीर सावरकरांचे बलिदान व त्यागाची माहिती, त्यांची भूमिका शहरातील नागरिक आणि तरुण पिढीला व्हावी यासाठी ही गौरव यात्रा काढली जाणार आहे. काँगेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सतत अपमान करत असल्याने ह्या यात्रे द्वारे त्यास प्रत्युत्तर दिले जाणार आहे असे यावेळी सांगण्यात आले.