वसुली न झाल्यास ठाण्यात पगार थांबवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:22 IST2017-07-18T02:22:22+5:302017-07-18T02:22:22+5:30
ठाणे महानगरपालिकेच्या उत्पन्नाची वसुली समाधानकारक न झाल्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नाराजी व्यक्त करून ज्या विभागांनी दिलेल्या
वसुली न झाल्यास ठाण्यात पगार थांबवणार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या उत्पन्नाची वसुली समाधानकारक न झाल्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नाराजी व्यक्त करून ज्या विभागांनी दिलेल्या उद्दिष्टांनुसार वसुली केलेली नाही, त्यांचे पगार थांबविण्यात येतील असा स्पष्ट इशारा दिला आहे. यापुढे पाणी बिले आॅनलाइन स्वीकारण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पालिकेच्या विविध विभागाच्या उत्पन्नवसुलीचा आढावा घेण्यासाठी नागरी संशोधन केंद्रात घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. जो विभाग दिलेल्या उद्दीष्टानुसार वसुली करणार नाही त्या विभागाच्या सर्व संबंधितांचे पगार थांबविण्याचा इशारा दिला. मालमत्ता, पाणी कर, शहरविकास विभाग, या प्रमुख स्त्रोेतांसह पालिकेच्या विविध विभागांमार्फत जी वसुली होते, ती जलदगतीने करण्यासाठी गंभीरपणे आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सुनावले.
जेथे पाणी अथवा मालमत्ता कराची बिले वितरित करण्यात आली नसतील तेथे ती शुक्र वारपर्यंत वितरित करण्याचे आणि थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.