शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा दोष असेल, तर त्यांनाही शिक्षा : ॲड. उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 05:54 IST

बदलापूर प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीचे लेखी आदेश सरकारकडून अजून प्राप्त झालेले नाहीत.

ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेचा पदाधिकारी दोषी असेल, त्याच्याविरुद्ध पुरावे आढळले तर प्रकरण तडीस  नेणार. तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपीला शिक्षा होण्यासाठी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार असल्याचा विश्वास बदलापूर अत्याचार प्रकरणातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

बदलापूर प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीचे लेखी आदेश सरकारकडून अजून प्राप्त झालेले नाहीत. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला याबाबत तोंडी विचारणा केल्यानंतर आपण त्याला सहमती दर्शविल्याचे ॲड. निकम यांनी सांगितले. विरोधी पक्षाने आपल्यावर घेतलेले आक्षेप खोडून काढताना ते म्हणाले, केवळ लोकसभेची निवडणूक लढवली म्हणजे मी विकला गेलो, असे होत नाही. २६/११ च्या कसाबच्या हल्ल्यात हेमंत करकरेंना मारले, त्यावेळी आरएसएसने त्यांना मारल्याचा जावईशोध याच व़डेट्टीवारांनी लावला होता.  नंतर एका पुस्तकाच्या आधारे आपण बोलल्याचे ते म्हणाले.

परंतु, यात तथ्य नव्हते. १९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यात सिनेअभिनेत्याला वाचविण्यासाठी सर्व बाजूंनी खटाटोप झाला. तेव्हा तर राज्य आणि केंद्रातही काँग्रेसचे सरकार होते. पण त्यावेळीही आपण प्रकरण धसास लावले. मुळात बदलापूरच्या आंदोलनावेळी लोकांची मागणी होती की, ॲड. निकम यांच्याकडे विशेष सरकारी वकील म्हणून जबाबदारी द्यावी. त्याला गिरीश महाजन यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळेच राज्य सरकारने आपली नियुक्ती केली. या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर सर्व बाजू पडताळून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपीला शिक्षा होण्यासाठी आपण भक्कमपणे बाजू मांडणार असल्याचे ॲड. निकम म्हणाले.

आरोपीला फासावर लटकवणे हेच ध्येय : शंभूराज देसाईबदलापूर :  बदलापुरातील घटनेनंतर सरकारने जे काही कठोर निर्णय घ्यायचे होते, ते घेतलेले आहेत. आरोपीला फाशीच्या दारात पोहोचविण्याचे काम सरकार करेल आणि त्यात कुठेही कमी पडणार नाही, असे मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी व्यक्त केले. पालकमंत्री देसाई हे घडलेल्या प्रकाराची माहिती घेण्यासाठी आणि पोलिसांच्या तपासाची माहिती घेण्यासाठी बदलापूरमध्ये आले होते.

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमbadlapurबदलापूर