शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डोक्यावर घेऊन नाचू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 09:14 IST

जरांगे-पाटील; २५ डिसेंबरनंतरचे आंदोलन सरकारला झेपणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सरकार कोणाचेही असले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. आरक्षण दिल्याखेरीज सरकारची सुटका नाही. आरक्षण देण्याकरिता विशेष अधिवेशनाची गरज नाही. योगायोगाने हिवाळी अधिवेशन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना आरक्षण दिले तर मराठे त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील, असे प्रतिपादन  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी ठाण्यात केले.

सापडलेल्या कुणबी नोंदी लक्षात घेऊन सरकारने आरक्षण द्यावे, अन्यथा २५ डिसेंबरनंतर होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील सभेत मराठा बांधवांना जरांगे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तर त्यांनाही आरक्षण द्यावे,  असे ग्रामीण भागातील ओबींसींचेही मत आहे. मी अंतरवालीला जायच्या आतच टाइमबॉन्ड आरक्षण जाहीर करा.

 भुजबळांच्या डोळ्यात मीच खुपतोय  कल्याण : भुजबळांना संताजी-धनाजीसारखा आता सगळ्या ठिकाणी मीच दिसतोय. त्यांना वैयक्तिक विरोध नव्हता, वैचारिक विरोध होता. मात्र, वैयक्तिक टीका करून सुरुवात त्यांनी केली. मराठा आरक्षणाला विरोध करण्याची गरज नव्हती. त्यामुळे आता त्यांच्यावर टीका करणार, असे मनोज जरांगे यांनी सोमवारी रात्री पोटे मैदानात झालेल्या सभेत सांगितले.माझ्या पाठीमागे सामान्य मराठ्यांची शक्ती आहे. मी कुणाचीही स्क्रिप्ट वाचत नसतो. वाचून माणूस एवढे बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे-पाटील यांनी दिली. मीरा-भाईंदर, बोईसर येथेही जरांगे यांच्या जाहीर सभा झाल्या. 

 मनोज जरांगे यांच्यासाठी गडकरी रंगायतनच्या व्यासपीठावर मोठी खुर्ची ठेवली होती, परंतु संपूर्ण भाषण त्यांनी उभे राहून केले.  बंदिस्त सभागृहात भाषणाची सवय नसल्याची कबुली त्यांनी दिली. मराठा मैदानात लढणारा असून पुढील सभा ठाण्यात मोकळ्या मैदानात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :marathaमराठाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलreservationआरक्षण