शिवसेनेने दगाबाजी न केल्यास भाजपा युतीस तयार
By Admin | Updated: September 21, 2015 03:41 IST2015-09-21T03:41:41+5:302015-09-21T03:41:41+5:30
केडीएमसी निवडणुकीत युती तुटण्याची चिन्हे असतानाच केंद्रात-राज्यात युती असताना ती महापालिकेत तुटू नये, असा पवित्रा भाजपाने घेतला आहे

शिवसेनेने दगाबाजी न केल्यास भाजपा युतीस तयार
अनिकेत घमंडी, डोंबिवली
केडीएमसी निवडणुकीत युती तुटण्याची चिन्हे असतानाच केंद्रात-राज्यात युती असताना ती महापालिकेत तुटू नये, असा पवित्रा भाजपाने घेतला आहे. त्यासाठी पक्षाचे विभागाध्यक्ष आणि केडीएमसी निवडणूकप्रमुख खासदार कपिल पाटील आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी ठाण्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यावेळी युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. शिवसेनेकडून कोणतीही दगाबाजी न झाल्यास युती राहावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पाटील म्हणाले की, युती सन्मानाने व्हावी. चांगले पोषक वातावरण असताना युती का तोडायची. गेल्यावेळच्या निवडणुकीत भाजपाने युती ठेवलीच होती. परंतु, त्यावेळेस शिवसेनेने बंडखोर, अपक्ष उमेदवार उभे करून त्यांना जिंकूनही आणले, एवढेच नव्हे तर निकालानंतर त्यांना पक्षातही घेतले होते. तसे यावेळेस होता कामा नये, असे परखडपणे त्यांनी सांगितले. मध्यंतरीही अशी चर्चा झाली होती, मात्र त्यानंतर पुढे काहीही निष्पन्न झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.