विद्यार्थ्याने साकारली कागदापासून मूर्ती
By Admin | Updated: September 23, 2015 23:48 IST2015-09-23T23:48:44+5:302015-09-23T23:48:44+5:30
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धुम सुरू आहे. या उत्सवात मुलांनीही रंग भरला आहे. कलाकुसरीचा घरातून वारसा नसताना आणि कोणाचेही मार्गदर्शन न घेता

विद्यार्थ्याने साकारली कागदापासून मूर्ती
पारोळ : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धुम सुरू आहे. या उत्सवात मुलांनीही रंग भरला आहे. कलाकुसरीचा घरातून वारसा नसताना आणि कोणाचेही मार्गदर्शन न घेता आपल्या हुशारीने खानिवडे गावातील आठवीत शिकणाऱ्या सुयश कुडू याने घरातच उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून मुर्ती बनवली आहे. जुने वर्तमानपत्र, पुठ्ठे तसेच वॉटर कलरचा योग्य वापर करून बनवलेली ही मुर्ती सर्वांना आकर्षित करत आहे.
जन्मजात चित्रकलेची आवड असलेला सुयश गणपतीचे रेखाचित्र चौथीत असल्यापासून काढत आहे. दरवर्षी त्याने काढलेले रेखाचित्र शाळेतील बोर्डावर लागते. त्यासाठी शाळेतून त्याला बक्षिसेही मिळाली आहेत. वयाच्या मानाने त्याला चांगली समज असून बनवलेली ही मूर्ती पर्यावरणपूर्वक असल्याचे परिसरातील नागरीक सांगतात. (वार्ताहर)