कल्याणच्या सिटी पार्कमध्ये चौदाशे वृक्ष लावण्याचा मानस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:29 IST2021-06-06T04:29:49+5:302021-06-06T04:29:49+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत गौरी पाडा येथे नदी किनाऱ्याजवळच सिटी पार्क विकसित केले जात आहे. या ...

कल्याणच्या सिटी पार्कमध्ये चौदाशे वृक्ष लावण्याचा मानस
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत गौरी पाडा येथे नदी किनाऱ्याजवळच सिटी पार्क विकसित केले जात आहे. या सिटी पार्कच्या जागेत चाैदाशे वृक्ष लावण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.
याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, उपअभियंता भालचंद्र नेमाडे, प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते, सुधीर मोकल, राजेश सावंत, दीपक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
गौरी पाडा येथे स्मार्ट सिटीअंतर्गत १०० कोटी रुपये खर्च करून सिटी पार्क उभारले जात आहे. त्यात विविध सोयीसुविधा असून या वृक्षांची लागवड पूर्णत्वास आल्यास या पार्क परिसराला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त होईल.
आयुक्तांच्या हस्ते सिटी पार्क प्रमाे बारावे येथील एकात्मिक घनकचरा विकास प्रकल्प आणि एसटीपी प्लांटच्या ठिकाणीही वृक्षारोपण करण्यात आले.
.....
फोटो ओळी- रोपण केलेल्या झाडासोबत आयुक्तांचा सेल्फी
.............
-------------------