शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मी कोणत्याही वादात पडणार नाही’ - डॉ. किशोर सानप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 21:25 IST

वेगळ्य़ा विदर्भाचा मुद्दा, असहिष्णूता, लेखकांना घातल्या जाणा-या गोळ्य़ा या वेगवेगळ्य़ा वादात मी पडणार नाही. मला कोणत्याही वादात पडायचे नाही. मला वाद या शब्दापासून अॅलर्जी आहे.

कल्याण -  वेगळ्य़ा विदर्भाचा मुद्दा, असहिष्णूता, लेखकांना घातल्या जाणा-या गोळ्य़ा या वेगवेगळ्य़ा वादात मी पडणार नाही. मला कोणत्याही वादात पडायचे नाही. मला वाद या शब्दापासून अॅलर्जी आहे. वादापेक्षा माझा जास्तीत जास्त भर संवादावर आहे असे वक्तव्य बदोडा येथे होऊ घातलेल्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. किशोर सानप यांनी आज येथे केले आहे.    मुंबईत अर्ज भरताना त्यांच्यासोबत कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व कवी साहित्यिक राजीव जोशी यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक नारायण लाळे हे देखील उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर त्यांनी सगळ्य़ात प्रथम कल्याण सार्वजनिक वाचनालयास भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपरोक्त मत व्यक्त केले. डॉ. सानप यांनी सांगितले की, वाद हा माझा विषय नाही. मी प्रतिभा आणि नैतिकता जपणारा सजर्नशील लेखक, कवी, कांदबरीकार आणि समीक्षक असल्याने मला कोणत्याही वादात पडायचे नाही. संत साहित्य ते आधुनिक साहित्यार्पयतचे सगळे विषय हाताळणारे लेखन मी केले आहे. माणसाची दु:खमुक्ती हा माङया लेखनाचा आणि चिंतनाचा विषय राहिला आहे. दु:ख मुक्तीचे साहित्य लेखन करणारे लेखक मला जास्त आवडतात. स्वांत सुखाय लेखन करणारे लेखक हे त्यांच्याच कोषात अडकून पडतात. महाभारतासारखे लेखन चिरकाल टिकते. ते अनादी काळापासून लोकप्रिय आजही लोकप्रिय आहे. याउलट आधुनिक साहित्याला मान सन्मान, पुरस्कार, प्रतिष्ठा जास्त मिळते. आधुनिक साहित्यिकांची कलाबाह्य दृष्टी जेव्हा हावी होते. तेव्हा लेखन राहत नाही. त्या लेखनाची गरजही मला वाटत नाही. हे एक सृजनाचे तत्व आदीम काळापासून चालत आहे. नव्या लेखकांवर लिहण्यासाठी कोणाला वेळ नाही. . कोणी लिहतही नाही. नव्या लेखकांवर लिहिले जात नाही. याविषयी मला काही बोलायचे नाही. मला देखील सगळ्य़ाच लेखकांवर लिहीता आलेले नाही. हे देखील मी मान्य करतो. खूप चांगले लेखक आहेत. त्यांच्यावर मी देखील लिहू शकलो नाही मला देखील मर्यादा आहेत, ही कबूली सानप यांनी  यावेळी दिली.     40 वर्षे लेखन कार्य करीत असताना 52 पुस्तकांचे लेखन व समीक्षा केली आहे. अनेक लेखकांच्या लेखनाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. माङो समकालीन साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. 9क् व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी देखील मला विचारले होते. तसेच वसंत डहाके यांनीही चंद्रपूरच्या साहित्य संमेलनानंतर अध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या तयारीला लागा असे सांगितले होते. लेखन कार्यकाळात मला उसंतच मिळाली नाही. त्यामुळे आत्ता मला वाटले म्हणून मी संमेलनाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत उतरलो आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने प्रतिवंतांच्या लेखनाची उलटतपासणी केली पाहिजे. कारण सृष्टीची नव्याने रचना करण्याची शक्यता प्रतिभावंताच्या लेखनातच असते. मी सन्मान पुरस्काराच्या मागे धावलो नाही. माझा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आहे. ज्यावेळा मी लोकशाही मानतो. त्यानुसार मला लोकशाही पद्धतीची निवडणूकीही मान्य आहे. मूळाच प्रतिभावंताला मते मागण्याची आवश्यकाच भासू नये. पण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ते करावे लागते. अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत उतरची तयारी आधीच केलेली असल्याने गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रभर दौरा झाला आहे. तसेच महाराष्ट्राबाहेर छत्तीसगढ, हैद्राबाद, कर्नाटक, बदोडा येथे जाऊन आलो आहे. मी अनेकांवर लिहिले आहे. त्यामुळे ते लोक मला मते देतील असा मला विश्वास आहे. 

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र