कट्ट्यांवरील गुलाबी आठवणींत रमतो! - नरेश म्हस्के

By अजित मांडके | Updated: February 23, 2025 08:49 IST2025-02-23T08:49:00+5:302025-02-23T08:49:20+5:30

राजकारणात वजन वाढले असे मी कधीच समजत नाही. लहान होतो, तेव्हापासून शाखेची लहानसहान कामे केली. - म्हस्के

I revel in the pink memories on the shelves! - naresh Mhaske | कट्ट्यांवरील गुलाबी आठवणींत रमतो! - नरेश म्हस्के

कट्ट्यांवरील गुलाबी आठवणींत रमतो! - नरेश म्हस्के

शब्दांकन : अजित मांडके

मी शून्यातून विश्व निर्माण केले. विविध क्षेत्रांतील मित्र जमवणे आणि वाचन हे माझे छंद आहेत. त्यातून काही गोष्टी कळत गेल्या. मी चांगले मित्र जमवले, परंतु राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करताना मी पक्षाचे प्रामाणिकपणे काम करतो. मात्र ते सुद्धा पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर मी मर्यादित ठेवतो. पक्षाच्या प्लॅटफॉर्मबाहेर माझ्यावर कोणी टीका करत असेल, तरीसुद्धा मी त्याच्या पक्षाची भूमिका म्हणूनच समजत असतो. त्यामुळे पक्षाच्या बाहेर मी सर्वांना आपले समजतो. मात्र, ही वाटचाल करताना आजही ठाण्यातील कट्ट्यावरील गुलाबी आठवणीत रममाण व्हायला मला आवडते. 

राजकारणात वजन वाढले असे मी कधीच समजत नाही. लहान होतो, तेव्हापासून शाखेची लहानसहान कामे केली. विद्यार्थी संघटनेचे काम केले. एक एक पायरी चढत गेलो. त्यामुळे राजकारणात माझे वजन नाही तर माझे वय वाढले. काही पदे मिळाली त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात माझे वजन कमी रहावे, यासाठी डाएट करतो. मात्र, माझे वजन वाढत आहे.

मोहनथाळ, खाजा आवडते
सगळे तेलकट आणि गोड पदार्थ माझ्या आवडीचे आहेत. त्यातही जत्रेतील मोहनथाळ आणि खाजा हे मला अतिशय आवडतात. परंतु, चमचमीत पदार्थ समोर आला तर मात्र स्वत:ला आवरता येत नाही. तेव्हा डाएटचा विचार करत नाही. 

ब्लेझर, जॅकेट आवडते
मला शर्ट, पॅन्ट, ब्लेझर आणि जॅकेट आवडतात. कपड्यांचा मी खूप शौकीन आहे. एखाद्या ठिकाणी मी शॉपिंगला गेलो की दुकानदारच मला सांगतो, आधीचे कपडे घाल मग नवीन घे.

कट्टे कसे बरे विसरणार? 
एक ठाणेकर म्हणून गोखले रोड, राम मारुती रोड ही आवडीची ठिकाणे. त्यातही गडकरी कट्टा, मांसुदा तलाव कट्टा ही अधिक आवडती. या रस्त्यांच्या आणि कट्ट्यांवरील खूप आठवणी आहेत. गडकरी कट्ट्यावर आवडीच्या नाट्य कलाकारांच्या आठवणी आहेत. गोखले रोड, राम मारुती रोडवरील काही नाजूक आणि गुलाबी आठवणी आहेत, ज्या सांगू शकत नाही.

सुबोध भावे, अमिताभ बच्चन 
हे आवडते कलाकार  
मराठीमध्ये सुबोध भावे हा आवडीचा कलाकार आहे. माझा मित्रसुद्धा आहे. मला त्याचा ‘बालगंधर्व’ हा चित्रपट अतिशय आवडतो. हिंदीमध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, अल्लू अर्जुन, परेश रावल, नसिरुद्दीन शहा, अनुपम खेर हे कलाकार आवडतात. चित्रपट पाहताना त्यातून काहीतरी घ्यायचे, या उद्देशाने मी चित्रपट पाहत नाही. मी निखळ आनंदासाठी चित्रपट पाहतो.

कुटुंबातील अंतिम निर्णय माझाच 
कुटुंबातील अंतिम निर्णय माझाच असतो. बरेचजण सहानुभूती मिळावी म्हणून पत्नी अंतिम निर्णय घेते, असे सांगतात. मात्र तसे काही नसते, पुरुषाचा निर्णय अंतिम असतो.
१५ ऑगस्टला मुलगी झाली 
मला मुलगी असावी, ही माझी खूप इच्छा होती. त्यातही १५ ऑगस्टला ती जन्मावी. मुलगा झाल्यानंतर स्व. आनंद दिघे यांना पेढे द्यायला गेलो, तेव्हा फॅमिली प्लॅनिंगविषयी बोललो.  तर ते म्हणाले, ‘घरात मुलगी असणे गरजेचे आहे. मुलगी असेल तर घराला शिस्त राहते, संस्कार राहतात. . दुसरी मुलगी झाली नाही तर मुलगी दत्तक घेण्याचा विचार केला होता. परंतु, मला मुलगी झाली आणि ती देखील १५ ऑगस्ट याच दिवशी.  

ब्लेझर, जॅकेट आवडते
मला शर्ट, पॅन्ट, ब्लेझर आणि जॅकेट आवडतात. कपड्यांचा मी खूप शौकीन आहे. एखाद्या ठिकाणी मी शॉपिंगला गेलो की दुकानदारच मला सांगतो, आधीचे कपडे घाल मग नवीन घे.
शब्दांकन : अजित मांडके
कट्टे कसे बरे विसरणार? 
एक ठाणेकर म्हणून गोखले रोड, राम मारुती रोड ही आवडीची ठिकाणे. त्यातही गडकरी कट्टा, मांसुदा तलाव कट्टा ही अधिक आवडती. या रस्त्यांच्या आणि कट्ट्यांवरील खूप आठवणी आहेत. गडकरी कट्ट्यावर आवडीच्या नाट्य कलाकारांच्या आठवणी आहेत. गोखले रोड, राम मारुती रोडवरील काही नाजूक आणि गुलाबी आठवणी आहेत, ज्या सांगू शकत नाही.

Web Title: I revel in the pink memories on the shelves! - naresh Mhaske

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.