दिवसभर भटकूनही गिऱ्हाईक मिळतच नाही
By Admin | Updated: December 26, 2016 05:58 IST2016-12-26T05:58:16+5:302016-12-26T05:58:16+5:30
मिक्सर ग्राईंडर फूड प्रोसेसरच्या जमान्यात जाते, पाटा, वरवंटा रगडा तडीपार झाला आहे. ग्रामीण भागात या वस्तू खरेदी

दिवसभर भटकूनही गिऱ्हाईक मिळतच नाही
मनोर : मिक्सर ग्राईंडर फूड प्रोसेसरच्या जमान्यात जाते, पाटा, वरवंटा रगडा तडीपार झाला आहे. ग्रामीण भागात या वस्तू खरेदी व्हायच्या परंतू नोटाबंदीमुळे आता उरलेसुरले ग्राहकही पाठ फिरवू लागल्याने उन्हातान्हात कच्च्याबच्च्यांना पाठीशी बांधून गाढवांच्या पाठीवर लादलेल्या जाते, पाटे, वरवंट्यालाही कुणी घेईनासे झाले आहे.
पूर्वी दगडाने घडवलेल्या पाटा, वरवंटा, जाते, भरडगे, रगडा या वस्तूंचा वापर करून चटणी, मिरची ठेचा, पुरण वाटणे, मसाला वाटणे यासाठी केला जायचा भात कांडण्यासाठी उखळ वापरले जायचे परंतु आता सारेकाही रेडीमेड मिळू लागले आहे. रेडी टू कुक, नाहीतर रेडी टू इट अशा जमान्यामुळे या दगडी चिजांची गरज कुणालाच भासेनाशी झाली आहे. औरंगाबाद परीसरातील पाथरवट या दगडी चिजा गाढवावर लादून मनोर परिसरात विक्री करण्यासाठी आले आहेत. एक जात्या चे वजन ३५ ते ४० किलो असून किंमत १२०० रूपये आहे त्याला घडवण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात परंतु नोट बंदीचा फटका त्यांच्या धंद्याला बसला आहे. परंतु हे अंगमेहनतीचे काम असल्याने म्हणून या समाजातील नवीन पिढीने त्याकडे पाठ फिरवलेली दिसत आहे. हरसुल औरंगबाद येथील प्रकाश भिकन पवार हा आपल्या पूर्ण परिवार सहित पालघर जिल्हातील मनोर येथे आपले अंगी असलेल्या कलेचा वापर करून जाते घढवून पोटाची खळगी भरतो त्याला विचारले असता तो म्हणाला की मी रोज दारोदारी जातो विक्रीसाठी जात असून कोणीही ते घ्यायाला तयार नाही. (वार्ताहर)